सातारा: काजू अन् बदामची आगळीवेगळी गणेशमूर्ती, पाटण तालुक्यात ठरला चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 05:45 PM2022-09-05T17:45:20+5:302022-09-05T17:45:45+5:30

पाटण तालुक्यातील तामकडे गावातील गणेशभक्त प्रमोद जाधव यांनी काजू, बदामचा कलात्मक वापर करत आगळीवेगळी गणेशमूर्ती साकारली आहे.

Different Ganesha idols made of cashew nuts and almonds, It became a topic of discussion in Patan taluka | सातारा: काजू अन् बदामची आगळीवेगळी गणेशमूर्ती, पाटण तालुक्यात ठरला चर्चेचा विषय

सातारा: काजू अन् बदामची आगळीवेगळी गणेशमूर्ती, पाटण तालुक्यात ठरला चर्चेचा विषय

Next

नीलेश साळुंखे

कोयनानगर : पाटण तालुक्यातील तामकडे गावातील गणेशभक्त प्रमोद जाधव यांनी काजू, बदामचा कलात्मक वापर करत आगळीवेगळी गणेशमूर्ती साकारली आहे. या मूर्तीची त्यांनी घरी विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आज, सोमवारी, दि. ५ गौरी या मूर्तीचे विसर्जन करणार येणार आहे.

तामकडे गावातील प्रमोद जाधव यांनी आपल्या राहत्या घरी काजू आणि बदाम या महागड्या ड्रायफ्रूटच्या सहाय्याने सुबक मूर्ती साकारली आहे. तसेच त्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही केली आहे. पाटण तालुक्यात हा वेगळा प्रयोग असल्यामुळे तालुक्यातून गणेशभक्त याठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करता आला नाही. यावर्षी गणेशोत्सवात नियमांना शिथिलता असल्यामुळे सर्व गणेशभक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची कल्पकता वापरून गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याचा गणेशभक्तांचा प्रयत्न आहे. तामकडे गावातही या प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे. आपण करत असलेल्या कामावर निस्सीम प्रेम व तेवढीच आदरयुक्त भावना ठेवत प्रमोद जाधव यांनी या गणरायाची स्थापना केलेली आहे.

पाटण तालुक्यात ठरला चर्चेचा विषय

प्रमोद जाधव यांनी काजू, बदामचा वापर करीत सुमारे पंचवीस हजार रुपये खर्च करून अडीच फूट उंचीची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून ही सुबक मूर्ती तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

Web Title: Different Ganesha idols made of cashew nuts and almonds, It became a topic of discussion in Patan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.