पोलीस कोठडीतच दिगंबर आगवणेंचा आत्महत्येचा प्रयत्न
By दीपक शिंदे | Published: August 30, 2022 11:30 AM2022-08-30T11:30:09+5:302022-08-30T11:38:54+5:30
सातारा : फलटण येथील पतसंस्था अपहार प्रकरणातील संशयित दिगंबर आगवणे यांनी लोणंद येथील पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ...
सातारा : फलटण येथील पतसंस्था अपहार प्रकरणातील संशयित दिगंबर आगवणे यांनी लोणंद येथील पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. टॉवेलच्या साह्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आगवणेंची प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने पुण्याला हलविण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, दिगंबर आगवणे हे सात दिवसांपासून फसवणुकीच्या गुन्ह्यात लोणंद पोलिसांच्या कोठडीत होते. आज, मंगळवारी पहाटे कोठडीत टॉवेलच्या साह्याने गळफास घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ही घटना काही वेळानंतर निदर्शनास आली. आगवणे यांच्यावर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.
कुटुंबीयांचा संताप
ही घटना समजल्यानंतर आगवणे कुटुंबीयांनी लोणंदमध्ये येऊन संताप व्यक्त केला. त्यांना सोमवारी भेटू न दिल्याचा आरोप बहिणीने केला. तर आई-वडिलांनाही भेटू दिले नाही म्हणून रुग्णवाहिकेच्या पुढे झोपून कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.