पोलीस ठाण्यात येणाºयांची अॅप्लिकेशनद्वारे डिजिटल नोंद : अभ्यंगतांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 10:51 PM2018-03-02T22:51:29+5:302018-03-02T22:51:29+5:30
सातारा : पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकांना पोलिसी वर्तणुकीचा चांगला-वाईट अनुभव येत असतो. यावर उपाय म्हणून जिल्हा पोलिसांनी विशेष अॅपतयार केले
स्वप्नील शिंदे ।
सातारा : पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकांना पोलिसी वर्तणुकीचा चांगला-वाईट अनुभव येत असतो. यावर उपाय म्हणून जिल्हा पोलिसांनी विशेष अॅपतयार केले असून, पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंद या अॅपमध्ये केली जाणार आहे. याची माहिती दररोज पोलीस अधीक्षकांना मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातील पोलिसांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम नावाचे अॅप प्रत्येक पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षातील संगणकाला जोडले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या सर्व हालचाली नोंदवल्या जात असून, त्याची माहिती थेट अधीक्षकांना मिळत आहे. पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येक अभ्यंगताची नोंद या अॅपमध्ये केली जाणार आहे.
ही नोंद होताच तत्काळ त्या अभ्यांगताच्या भ्रमणध्वनीवर एक संदेश येईल. त्याद्वारे संबंधित व्यक्ती आपला अभिप्रायही नोंदवू शकतो.
अभ्यंगतांना ठाण्यात कशी वागणूक मिळाली, कर्मचारी कसे वागले, कामावर समाधान आहे का? त्याची माहिती या संदेशाद्वारे देता येणार आहे. हे अॅप मुख्यालयातील अधीक्षकांच्या संगणकाशी जोडले आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात किती अभ्यंगत आले? ते त्यांना समजणार आहे. पोलीस ठाण्यात किती तक्रारदार आले, याच्या नियोजनाबरोबर ही यंत्रणा अनेक दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.
व्हिजिटर सिस्टिमचे फायदे
अभ्यंगताचे हेलपाटे कमी होणार
दररोज किती लोक येतात, का येतात, कुठल्या तक्रारी घेऊन येतात? याची माहिती साठवता येणार आहे.
पोलीस कर्मचाºयांचे वर्तणुकीची माहिती पोलीस प्रमुखांना मिळणार
तक्रार वाढल्यास ठाणे प्रमुखाला जाब विचारणार
या कार्यप्रणालीमुळे पोलीस प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना पोलीस ठाण्यात मिळणारी वागणूक आणि हेलपाटे काही प्रमाणात कमी होणार आहे. तक्रारी वाढल्यास थेट पोलीस ठाणे प्रमुखाला विचारणा केली जाईल.
-संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक