कर्तबगार महिलांचा घरी जाऊन सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:39 AM2021-03-10T04:39:10+5:302021-03-10T04:39:10+5:30
म्हसवड : माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील कर्तबगार महिलांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला. माण ...
म्हसवड : माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील कर्तबगार महिलांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला.
माण तालुका विविध क्षेत्रात प्रगती करत असताना महिलांचे योगदान आहे. विशेष करून शिक्षण क्षेत्रात अनेक महिला शिक्षिका उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सतत धडपडणाऱ्या काही महिला शिक्षिकांचा माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या घरी जाऊन मान्यवरांच्याहस्ते सन्मान केला.
यावेळी माण पंचायत समितीच्या सभापती कविता जगदाळे, माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते, शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन महेंद्र अवघडे, विस्ताराधिकारी संगीता गायकवाड यांची उपस्थिती होती. अंजली खाडे, वैशाली खाडे, सीमा मोहिते, सविता शिलवंत, स्वाती कुंभार, अनुसया गोरे, रंजना गोरे, सुनीता यादव, इंद्रायणी जवळ, भारती ओंबासे, छाया वाघमोडे, मीना बनसोडे, सुनीता पिसाळ, उर्मिला मदने, मनीषा ननावरे, रेखा जगदाळे, अलका कुलकर्णी या शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मोहनराव जाधव, सूरज तुपे, महेश माने, हरिष गोरे, रामभाऊ खाडे, दत्तात्रय कोळी, अजित गलांडे, दत्तात्रय गलांडे, राजाराम पिसाळ, नंदकुमार साखरे उपस्थित होते.