ऊस हवा तर ठिबक करा

By admin | Published: February 15, 2016 10:51 PM2016-02-15T22:51:49+5:302016-02-15T23:59:17+5:30

शरद पवार : बाळूपाटलाचीवाडी येथे २०० एकर ठिबक सिंचन योजनेचा शुभारंभ

Dip the cane if the air | ऊस हवा तर ठिबक करा

ऊस हवा तर ठिबक करा

Next

लोणंद : ‘आज पाणी टंचाईचे मोठे सावट राज्यावर आहे. वीर धरणाची पाणीपातळी खालावल्याने पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. इंडोनेशिया देशाने ४० दिवस पाणी लागणार नाही, अशी उसाची प्रजाती बनविली आहे. उसाला जास्त पाणी लागले हा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. एक एकरासाठी पाटाने जेवढे पाणी लागते ते पाणी ड्रीपने तीन एकर शेतीस पुरते. त्यामुळे बाळूपाटलाचीवाडी येथील सामुदायिक ड्रिपचा इतरांनी आदर्श घेणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.
खंडाळा तालुक्यातील बाळूपाटलाचीवाडी येथे म्हातलिंग जलउपसा सिंचन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या सामुदायिक २०० एकर ठिबक सिंचन योजनेचाा शुभारंभ व श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी विधान परिषदेचे सभापती राजराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, बाळासाहेब सोळस्कर, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा बॅँक संचालक दत्तानाना ढमाळ, आनंदराव शेळके-पाटील, सभापती नितीन भरगुडे-पाटील, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, रमेश धायगुडे-पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, ‘लोणंद सारख्या ठिकाणी १०० बेडचे रुग्णालय उभारणे व ते सक्षमपणे चालविणे हे काम धाडसाचे असून, कौतुकास्पद आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटलने अल्पावधीत रुग्णांचा विश्वास संपादन केला असून, या रुग्णालयाने जिल्ह्णात नावलौकिक मिळविला आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट असून, बाळूपाटलाचीवाडी येथील शेतकऱ्यांचा पाणी बचतीचा उपक्रम राज्याला मार्गदर्शक आहे. या सामुदायिक ड्रीप उपक्रमाचा इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा,’ लोणंदचे चित्र झपाट्याने बदलले असून कारखानदारी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तालुक्यात विकासाबरोबरच बार संस्कृती देखील वाढताना दिसत आहे. व्यवसाय वाढले पाहिजेत मात्र, चांगले व्यवसाय वाढले पाहिजेत,’ असेही यावेळी शरद पवार म्हणाले.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, डॉ. नितीन सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी किसन धायगुडे, आनंदराव कदम, बापूराव धायगुडे, राजू धायगुडे, अशोक कदम, कांतिलाल धायगुडे, सरपंच शुभांगी धुमाळ, दत्तात्रय धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)


शरद पवार यांचा एक तपानंतर कार्यक्रम
रामराजे म्हणाले, जिल्ह्यात डॉ. सावंत व सिद्धिविनायक हॉस्पिटलने वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हा बॅँकेच्या नफ्यातील ५० कोटी रुपये आम्ही ड्रीपसाठी दिले असून, भविष्यात ड्रीप शिवाय पर्याय नाही.’ दरम्यान, शरद पवार यांचा एक तपानंतर तालुक्यात कार्यक्रम झाला.

Web Title: Dip the cane if the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.