रस्त्यावर घाण केल्यास थेट दंडाची पावती : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळाले अधिकार शासनाचा अध्यादेश; खासगी जागेत घाण करणाºयांना चाप; कचरा टाकणे, थुंकणेही महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:24 AM2018-01-05T01:24:34+5:302018-01-05T01:25:16+5:30

मलकापूर : सार्वजनिक जागेत कोणत्याही प्रकारची घाण करणाºयावर दंडात्मक कारवाई करण्याचे थेट अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. याबाबत थेट कायदाच तयार

Direct dowry receipt if dirt on the road: Ordinance of authority to the local government institutions; Arc dumping in private space; Garbage and spit too expensive | रस्त्यावर घाण केल्यास थेट दंडाची पावती : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळाले अधिकार शासनाचा अध्यादेश; खासगी जागेत घाण करणाºयांना चाप; कचरा टाकणे, थुंकणेही महागात

रस्त्यावर घाण केल्यास थेट दंडाची पावती : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळाले अधिकार शासनाचा अध्यादेश; खासगी जागेत घाण करणाºयांना चाप; कचरा टाकणे, थुंकणेही महागात

Next

मलकापूर : सार्वजनिक जागेत कोणत्याही प्रकारची घाण करणाºयावर दंडात्मक कारवाई करण्याचे थेट अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. तसा कायदाच शासन स्तरावर झाला असल्यामुळे सार्वजनिक जागेत घाण करणाºयांनी यापुढे सावधान राहिले पाहिजे. याबाबत थेट कायदाच तयार झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणे, शौचास जाणे किंवा थुंकणेही महागात पडणार आहे.

आत्तापर्यंत एखादे चुकीचे काम केल्यास पोलिस, आरटीओ अशा खात्यालाच थेट दंडात्मक कारवाईचे अधिकार प्राप्त होते. मात्र, अशा प्रकारच्या खात्यांबरोबरच स्वच्छ भारत अभियानांतर्गत सरकारने नवीन कायदा तयार केला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाण केल्यास पोलिस व आरटीओप्रमाणे थेट दंड आकारण्याचे अधिकार पालिका व पंचायतींना देण्यात आले आहेत. तसा अध्यादेशही सर्व पालिकांना देण्यात आला आहे. त्यामधे सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, उपद्रव होऊ शकेल असे टाकाऊ पदार्थ टाकणे, अस्वच्छ परिस्थिती निर्माण करणे तसेच या नियमान्वये प्रतिबंधित करूनही सार्वजनिक सुव्यवस्था, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता, स्वास्थ्य बाधित होईल, अशी अस्वच्छता करणाºयास दंड करण्याचे अधिकार देण्यात आले.

सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी निष्काळजीपणाने टाकलेली, फेकलेली, पसरवलेली घाण किंवा सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी घाण टाकणारी, फेकणारी, पसरवणारी कृती अशा सर्व घटकांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय या शासन नियमांमध्ये वापरलेले शब्द व वाक्यांमध्ये ज्यांची व्याख्या केलेली नाही, अशा सर्व बाबींसाठी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६, पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण अधिनियम १९८१, कचरा व्यवस्थापन नियम यापैकी संबंधित अधिनियम / नियमामध्ये नियुक्त केल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था दंड आकारणार आहेत.

...अशी होणार दंडात्मक कारवाई
उघड्यावर शौचास गेल्यास पाचशे तर घाण टाकल्यास १५० रुपये दंड केला जाणार आहे. रस्ते, मार्गावर घाण करणाºयांसाठी ‘अ’ व ‘ब’ वर्ग पालिका कार्यक्षेत्रात १८० रुपये तर ‘क’ व ‘ड’ वर्ग पालिका तसेच पंचायत क्षेत्रात १५० रुपये दंड आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ‘अ’ व ‘ब’ वर्ग पालिका क्षेत्रात दीडशे रुपये, ‘क’ व ‘ड‘ वर्ग पालिका तसेच पंचायत क्षेत्रात शंभर रुपये दंड ठरवला आहे. उघड्यावर लघुशंका करणारास ‘अ’ व ‘ब’ वर्ग पालिका क्षेत्रात २०० रुपये, ‘क’ व ‘ड’ वर्ग पालिका तसेच पंचायत क्षेत्रात १०० रुपये दंड करण्यात येणार आहे.
उघड्यावर शौच करणाºयांना अ, ब, क, ड वर्ग पालिका क्षेत्रात ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.

कचरा टाकणाºयास  जागेवरच पावती
नवीन कायद्यानुसार ‘स्पॉट फाईन’ करण्यासाठी नेमलेल्या पथकाकडे दंडाचे पावती पुस्तक देण्यात आले आहे. स्वच्छतेबाबत कोणत्याही कारणांमुळे एखाद्याला ‘आॅन दी स्पॉट’ पकडले तर त्याचक्षणी त्याला दंडाची पावती देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मलकापूर नगरपंचायतीने ही जबाबदारी वसुली कर्मचाºयांवर सोपवली आहे.

नळ कनेक्शन बंद किंवा घरपट्टीत समावेश
एखाद्या नागरिकाने स्वच्छतेबाबत केलेल्या गुन्ह्यात वाद घालत दंड न भरल्यास त्या घटनेचे फोटो काढून पुरावा तयार केला जातो. त्यानंतर संबंधित नागरिकाचे नळ कनेक्शन बंद करण्याची तरतूद कायद्यात आहे. तरीही दंड नाही भरल्यास या दंडाची रक्कम घरपट्टीत समावेश करणे व अंतिम उपाय म्हणून संबंधितावर गुन्हा दाखल करून न्यायालयात उभे करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

बाहेरील  व्यक्तीवर थेट गुन्हा
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत तयार केलेल्या कायद्यानुसार कामानिमित्त शहरात बाहेरून आलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी एखादा गुन्हा केला. त्याने नियमानुसार ‘स्पॉट फाईन’ भरण्यास असमर्थता दाखवल्यास संबंधित व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत न्यायालयात १ हजार ते १ हजार ५०० पर्यंत दंड होऊ शकतो.

तीन दिवसांत १ हजार ९५० दंड वसूल
स्वच्छतेबाबत राज्य शासनाने केलेल्या नवीन कायद्याची मलकापूर नगरपंचायतीने तत्काळ अंमलबजावणी केली आहे. उघड्यावर शौचास बसलेल्या परगावच्या ३ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे १ हजार ५०० तर उघड्यावर घाण टाकणाºया ३ नागरिकांकडून प्रत्येकी १५० रुपयाप्रमाणे ४५० रुपये असा तीन दिवसांत १ हजार ९५० रुपये दंड मलकापूर नगरपंचायतीने वसूल केला आहे.

‘स्पॉट फाईन’साठी स्वतंत्र पथक
शहरात उघड्यावर घाण करणारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने नवीन कायदा केला आहे. ‘स्पॉट फाईन’चे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. या कामासाठी पालिकांना स्वतंत्र पथकाची नेमणूक करावी लागणार आहे. त्यानुसार मलकापूर नगरपंचायतीने पाच कर्मचाºयांचे पथक तयार केले आहे. हे पथक पहाटे पाच ते सकाळी आठपर्यंत प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहेत. त्यासाठी चार प्रभागांत चार व एक फिरत्या कर्मचाºयाचा या पथकात समावेश केला आहे.
 

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शासनाने ३० डिसेंबरला नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार स्वच्छतेबाबत सार्वजनिक ठिकाणी व उघड्यावर घाण करणाºयावर थेट कारवाई करण्याचे अधिकार पालिकांना देण्यात आले आहेत. त्याची मलकापुरात तत्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. तीन दिवसांत सहा जणांवर कारवाई केली आहे. सर्व सुविधा देऊनही जर उघड्यावर घाण करत असेल तर यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही.
- संजीवनी दळवी, मुख्याधिकारी, मलकापूर

Web Title: Direct dowry receipt if dirt on the road: Ordinance of authority to the local government institutions; Arc dumping in private space; Garbage and spit too expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.