सातारा जिल्ह्यातील माळी समाजाकडून राज्याला दिशा!

By Admin | Published: January 6, 2016 11:38 PM2016-01-06T23:38:06+5:302016-01-07T01:00:22+5:30

फुलेंचा समाज : सावता माळीपासून ते महात्मा ज्योतिबा फु ले, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे माळी समाजाचेच

The direction of the state from the Mali community in Satara district! | सातारा जिल्ह्यातील माळी समाजाकडून राज्याला दिशा!

सातारा जिल्ह्यातील माळी समाजाकडून राज्याला दिशा!

googlenewsNext

संतोष गुरव- कऱ्हाड  -समाजातील अशिक्षित व बेरोजगार, जातीव्यवस्थेतील लोकांना दिशा देण्याचे काम माळी समाजाने केले आहे. स्त्रियांना सतीपासून परावृत्त करून पूर्नविवाहाची प्रथाही सर्वप्रथम माळी समाजामध्येच रूढीस आली. अशा माळी समाजातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य सातारा जिल्ह्याचेच होय. त्यांनी आपल्या कार्यातून सपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले.
खंडाळा तालुक्यातील नायगावच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व खटाव तालुक्यातील कटगुणचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण, समाजव्यवस्था व धर्म, जातींबाबत मोठे कार्य केले.
जातीने माळी असूनदेखील त्यांनी सर्वधर्मसमभाव जपला. त्यांच्या माळी समाजाचेही एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. माळी समाजाने आपली परंपरा व रितीरिवाज आजही जपला आहे.
महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची जोपासना करत आजही माळी समाजातील व्यक्ती शिक्षण, वैद्यकीय, राजकारण तसेच उद्योग क्षेत्रांमध्ये क्रांती घडवत आहेत.
माळी समाजाच्या दोन जाती आहेत. एक म्हणजे लिंगायत व दुसरी खतावणी होय. लिंगायत व खतावणी जातीमधील लोकांची राहणीमानही काहीशा प्रमाणात विभक्त पद्धतीची असलेली पाहावयास मिळते.
सातारा जिल्ह्यात माळी समाजाची लोकसंख्या ही साधारणत: लाखापेक्षाही जास्त आढळते. महादेव व वीरशैव बसवेश्वर दैवत यांची माळी समाजातील लोक पूजा करतात. लिंगायत माळी हे श्रावणातील सर्व सोमवारी शंकराची पूजा करतात. त्यामध्ये देवाला बेलाची पाने व झेंडूची फुले घालतात. माळी समाजातील लोकांची विवाहाचीही पद्धत वेगळ्या स्वरूपाची आहे. त्यामध्ये माळी समाजात नवजोडप्यांचा विवाह हा बैठकीच्या पद्धतीने साजरा केला जातो. हातामध्ये नारळ देऊन मंगलाष्ठकांच्या साक्षीने या समाजातील विधी केले जातात.
माळी समाजातील लोक हे जास्त करून पश्चिम महाराष्ट्रात आढळून येतात. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगरजिल्ह्यात जास्त लोकसंख्या ही माळी समाजातील लोकांची आढळते.
बाराबलुतेदारीमधील एक व महत्त्वपूर्ण समाज म्हणून माळी समाजाकडे पाहिले जाते. माळी समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे लग्न कार्यात नवरदेवाला मंडवळी, हार, तुरे हे देण्याचे काम करतात. प्रत्येक सनाला बेल व झेंडूची फुले वाटण्याचे काम माळी समाजातील लोकांकडून केले जाते. बेंदूर, दिवाळी अशा सणाला बेल व चंदनाची पाने वाटली जातात. माळी समाजात पुर्नविवाह तसेच विधवा विवाह पद्धत फुले यांच्या काळापासून केले केली जाऊ लागली.
जातीने माळी असलेल्या लोकांकडून फुलबेल विक्रीचा व्यवसाय हा पंरपरागत पद्धतीने केला जातो. बाराबलुतेदारांपैकी एक असलेल्या माळी समाजातील लोकांकडून गावच्या दैवतामधील महादेवाची पूजा ही केली जाते. त्यासाठी या समाजातील लोक देवाची पूजाअर्चा नित्यनेमाने करतात. त्याबदल्यात त्यांना गावातील लोकांकडून धान्य तसेच नैवद्य दिला जातो. प्रत्येक सणाला गावातील लोकांना बेल व फुले, चंदनाची पाने वाटून त्यांना धार्मिक विधितीसाठी धार्मिक साहित्य पूरविण्याचे काम हे या समाजातील लोक करत असतात. त्यामुळे गावातील इतर धर्म, जातीतील लोकांशी त्यांचा सलोखा हा वाढण्यास मदतही होते. महादेवाची पूजा करून समाजात ज्ञानदानाचे काम माळी समाज आजही करत आहे.


समाजातील स्त्रियांचा मळवट प्रसिद्ध
माळी समाजातील विवाहित स्त्रिया या आपल्या कपाळावर कुंकवाच्या गोल टिकलीबरोबर आडव्या पद्धतीने मळवटही लावतात. साधारण साधी राहणीमानी अवलंबवून धार्मिक कार्यात बेल, चंदनाची पाने व झेंडूची फुलेही वाटतात. माळी समाजातील स्त्रियांच्या डोक्यावरील मळवटामुळे त्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते. माळी समाजातील विवाहाची पद्धत ही वेगळ्या स्वरूपाची आहे. या समाजात नवरा व नवरीला पाटावर बसवून हातात नारळ देऊन मंगलाष्ठकांच्या साह्याने विवाह केले जातात. विवाहानंतर देवास नैवेद्याच्या स्वरूपात बोकडही काही दिले जाते.
समाजाचा विवाहही वेगळ्या पद्धतीने
माळी समाजातील विवाहाची पद्धत वेगळी आहे. नवरा व नवरीला पाटावर बसवून हातात नारळ देऊन मंगलाष्ठकांच्या साह्याने विवाह केले जातात. काही ठिकाणी विवाहानंतर देवास नैवेद्याच्या स्वरूपात बोकडही दिले जाते.


महाराष्ट्रात माळी समाजातील लोकांना मोठ्याप्रमाणात महत्त्व आहे. सामाजिक क्षेत्रासह राजकीय, सांस्कृतिक अशा क्षेत्रात उच्चपदावर या समाजातील लोकांनी महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. आजही समाजातील लोकांकडून धर्मातील जाती, परंपरा नित्यनेमाने पाळल्या जातात.
- मोहनराव माळी, संस्थापक, दत्त अपंग संस्था, आगाशिवनगर, मलकापूर

Web Title: The direction of the state from the Mali community in Satara district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.