खड्डा की डबर.. कोडं काय उलगडेना..!

By admin | Published: October 10, 2016 12:01 AM2016-10-10T00:01:38+5:302016-10-10T00:01:38+5:30

पुसेगाव मार्गावरील स्थिती : वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

The dirt of the pit .. What do you disturb the code ..! | खड्डा की डबर.. कोडं काय उलगडेना..!

खड्डा की डबर.. कोडं काय उलगडेना..!

Next

 
वडूज : येथील पुसेगाव रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पडलेल्या खड्ड्यामुंळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून, हा खड्डा आहे की डबर? हा एकच सवाल सर्वांसमोर उभा ठाकला आहे.
वडूज-पुसेगाव हा मुख्य रहदारीचा रस्ता असून, जिल्ह्याच्या ठिकाणावरून ये-जा करण्याचा हा एकमेव प्रमुख रस्ता आहे. दररोज हजारो वाहने वडूज-सातारा असा प्रवास याच रस्त्यावरून करतात. या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. कारण याच ठिकाणी छोटा ओढा असल्याने खड्डे चुकविताना प्रसंगी वाहनचालक या ओढ्यात घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाला या समस्येबाबत सूचना केल्या आहेत. याविषयी हा विभाग गंभीर दखल घेत नसल्याचे लक्षात येत असून, या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची संबंधित विभाग वाट पाहत आहे का? असा सवालही वाहनचालकांमधून निर्माण होत आहे. सहायक निबंधक कार्यालय, बाजार समिती, न्यायालय या रस्त्याच्या परिसरात असून देखील संबंधित विभाग याविषयी गांधारीची भूमिका बजावत असल्याचे सदृश्य चित्र पाहवयास मिळत आहे. (प्रतिनिधी)
उपाययोजनेची मागणी
खड्ड्यांप्रमाणेच रस्त्यालगत असणारी झुडपे यामुळे ही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. यापूर्वी वडूज-दहिवडी रस्त्यालगत असणारे मोठे खड्डे या विभागाने एका संघटनेने केलेल्या अभूतपूर्व आंदालेनामुळे तातडीने दुरुस्त केले. याचाच अविभाज्य भाग की काय म्हणून या रस्त्यावर असणारे खड्डे मुजविण्यासाठी आणि रस्त्यालगतची झुडपे काढण्यासाठी अशाच आंदोलनाची वाट पाहत हे विभाग हातावर हात ठेवून बसले आहे की काय? असा यक्षप्रश्न ही सामान्यांना पडला आहे.

 

Web Title: The dirt of the pit .. What do you disturb the code ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.