येवती रूग्णालयात ग्रामस्थांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 04:18 PM2017-09-07T16:18:43+5:302017-09-07T16:20:54+5:30

येवती, ता. कºहाड येथील आरोग्य केंद्र असुण अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. येथे रूग्णांना योग्य त्या सोयीसुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Disadvantages of the villagers in Yevati Hospital | येवती रूग्णालयात ग्रामस्थांची गैरसोय

येवती रूग्णालयात ग्रामस्थांची गैरसोय

googlenewsNext
ठळक मुद्देयेवती येथील ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया डॉक्टर, कर्मचाºयांचा मनमानी कारभारआरोग्य केंद्राची अवस्था असून अडचण नसून खोळंबा

उंडाळे : येवती, ता. कºहाड येथील आरोग्य केंद्र असुण अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. येथे रूग्णांना योग्य त्या सोयीसुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.


येवती आरोग्य केंद्राअंतर्गत पाटीलवाडी, शेळकेवाडी, घराळवाडी, शेवाळेवाडी, हणमंतवाडी, म्हासोली अशी अनेक वाड्या वस्तीवरील गावे आहेत. या परिसरातील अनेक रूग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात. मात्र, चक्क आरोग्य केंद्राचे डॉक्टरच उशिरा येत असल्याने रूग्णांना ताटकळत बसावे लागते.

सध्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची वेळ सकाळी दहा ते दोन आणि सायंकाळी चार ते पाच अशी आहे. मात्र, अशी वेळ असताना डॉक्टर व कर्मचारी अकरानंतर येतात. त्यामुळे येथील आरोग्य केंद्राला शिस्त लावणार कोण? असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. मात्र, गरीब व गरजू रूग्णांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे.


येथील आरोग्य केंद्राची अवस्था ही असून अडचण नसून खोळंबा अशी झाल्याचे दिसून येते. यापूर्वी या आरोग्य केंद्राला दोन डॉक्टर कार्यरत होते. त्यामधील एका डॉक्टरांची बदली झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून या दवाखान्याने दुसरा डॉक्टर पाहिला नाही.

गेल्या दोन वर्षापूर्वी या दवाखान्यात रूग्णांची अक्षरश: गर्दी व्हायची. आणि दिवसाला तब्बल शंभर ते दीडशे रूग्णांची तपासणी केली जायची. आता मात्र, दवाखान्याकडे रूग्णही कमी जातात. कारण दवाखान्यामध्ये डॉक्टरच वेळवर उपलब्ध नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागते.


येवती आरोग्य केंद्राच्या माध्यमातून डॉक्टरांचय निवासस्थानाची सोय करण्याचे काम जोमाने सुरू आहे. काही निवासस्थाने तयार असून सुद्धा डॉक्टर व कर्मचारी राहत नसून ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी दयनीय अवस्था येथील दवाखान्यांची झाली आहे. अशा डॉक्टर व कर्मचारी यांना शिस्तीचे धडे 


येवती प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन डॉक्टर कार्यरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एकाच डॉक्टर कार्यरत आहेत. आणि ते सुद्धा वेळेवर येत नाहीत. त्यामुळे रूग्णांना खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे लागते. याकडे  आरोग्य विभागोन तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सदरचा प्रश्न न मिटल्यास उग्र  आंदोलन छेडण्यात येईल.
दिपक शेवाळे
ग्रामस्थ,
येवती, ता. कºहाड


येवती आरोग्य केंद्राबाबत आमच्याकडेही काही तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची गांभिर्याने दखल घेतली असून जिल्हा आरोग्य अधिकाºयांशी याबाबत चर्चा झाली आहे. आरोग्य केंद्राबाबत योग्य त्या उपाययोजना करून ग्रामस्थांची गैरसोय दूर केली जाईल. 
- सुनिल कोरबू,
तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: Disadvantages of the villagers in Yevati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.