कोयनेच्या सहा दरवाजांतून ५२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:59 PM2021-07-31T18:59:50+5:302021-07-31T19:01:08+5:30

Rain KoynaDam Satara : कोयना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळत असून कोयना धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. कोयनेतील पाणीसाठा ८७.८२ टीएमसी झाला असून कोयना धरणाच्या सहा दरवाजांतून ५२ हजार १७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Discharge of 52,000 cusecs of water through six gates of Koyne | कोयनेच्या सहा दरवाजांतून ५२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोयनेच्या सहा दरवाजांतून ५२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Next
ठळक मुद्देआवक वाढली; नवजा, महाबळेश्वरमध्येही संततधार सुरुचजिल्ह्यात सरासरी ११.०६ मिलिमीटर पाऊस

सातारा : कोयना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळत असून कोयना धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. कोयनेतील पाणीसाठा ८७.८२ टीएमसी झाला असून कोयना धरणाच्या सहा दरवाजांतून ५२ हजार १७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोयना धरणामध्ये शनिवारी सकाळपर्यंत ३९ हजार ६५४ क्युसेक इतक्या पाण्याची आवक झाली. धरणातील पाण्याची आवक वाढल्याने प्रशासनाने पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. कोयना धरण परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ ते शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७० मिलिमीटर, नवजात ११० मिलिमीटर, महाबळेश्वरमध्ये ८७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरापासून शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी एकूण ११.६ मि.मी. पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी ४३९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- ८.१, जावळी- १३.४, पाटण-३८.१, कराड-१३.६, कोरेगाव-२.६, खटाव-१.८, माण- १.२., फलटण- ०.३, खंडाळा- ०.१, वाई-४.७, महाबळेश्वर- ६३ इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात प्रमुख धरणांतून विसर्ग सुरुच

उरमोडी धरणातून ८४१ क्युसेक, कण्हेरमधून १४०६ क्युसेक, धोममधून ७४६ क्युसेक, बलकवडीतून २८० क्युसेक, वांग मराठवाडीमधून १,७२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग शनिवारी सकाळी ८ पासून सुरु होता.

धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
कोयना : ८७.८२
उरमोडी : ७.४०
कण्हेर : ७.६३
धोम : १०.२०
बलकवडी : ३.३७
वांग मराठवाडी : १.९२९
मोरणा गुरेघर : ०.९५९

Web Title: Discharge of 52,000 cusecs of water through six gates of Koyne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.