कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 06:22 PM2022-07-13T18:22:10+5:302022-07-13T18:23:13+5:30
कोयना धरणाच्या पायता विद्युत ग्रहातून 1050 क्युसेक विसर्ग
प्रमोद सुकरे
कराड : गेल्या पाच दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाण्याची आवक लक्षात घेऊन आज, बुधवारी सायंकाळी ५ वाजता कोयना धरणाच्या पायता विद्युत ग्रहातून 1050 क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात आली असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली.
कोयनानगर - पाटण - नवजा आदी परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आतापर्यंत कोयना धरणात 40.63 टीएमसी, पाणी साठा झाला आहे. धरणात पाणी आवक ४९५२५ क्युसेक अशी आहे. दरम्यान कोयना धरणातून पाणी सोडले नंतर नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.