ढेबेवाडीच्या बाजारात वाहतुकीला शिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:35+5:302021-01-16T04:42:35+5:30
ढेबेवाडीची बाजारपेठ मोठी असून, या ठिकाणी मंगळवारी आठवडे बाजार असतो. बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. बसस्थानकानजीक तिकाटण्याजवळच विक्रेते ...
ढेबेवाडीची बाजारपेठ मोठी असून, या ठिकाणी मंगळवारी आठवडे बाजार असतो. बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. बसस्थानकानजीक तिकाटण्याजवळच विक्रेते बसत असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्याला शिस्त लागणे गरजेचे आहे यासाठी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी कडक सूचना दिल्या. वाहतूक नियमांचा भंग करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. दररोज वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस सम-विषम तारखेप्रमाणे पार्किंगचे नियोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूला पार्किंग होणार असल्याने अस्ताव्यस्त पार्किंगचा प्रश्न निकाली निघणार आहे.
- कोट
वाहतूक शिस्तीसाठी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संतोष पवार राबवत असलेले धोरण योग्य असून, त्यासाठी ग्रामपंचायतीचे योग्य सहकार्य राहील. ढेबेवाडी बाजारपेठ ही भागाची महत्त्वाची बाजारपेठ असून, या ठिकाणी गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- अमोल पाटील
सरपंच, मंद्रुळकोळे, ता. पाटण
फोटो : १५केआरडी०७
कॅप्शन : ढेबेवाडी, ता. पाटण येथील बाजारपेठेत पोलिसांनी वाहतुकीच्या शिस्तीसाठी वाहनधारकांना सूचना केल्या. (छाया : बाळासाहेब रोडे)