पडक्या घरातील आत्महत्या आठवड्याने उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:29 PM2018-02-04T23:29:36+5:302018-02-04T23:30:46+5:30

Discovered in the fall suicides week | पडक्या घरातील आत्महत्या आठवड्याने उघड

पडक्या घरातील आत्महत्या आठवड्याने उघड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड/तांबवे : आठ दिवसांपूर्वी जेवण करून घराबाहेर पडलेल्या युवकाचा मृतदेह गावातीलच एका पडक्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. उत्तर तांबवे, ता. कºहाड येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुनील व्यंकट जाधव (वय २४) असे या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर तांबवे येथील सुनील जाधव हा युवक अबोल स्वभावाचा होता. तो काही महिन्यांपासून तो पुण्यातील खासगी कंपनीमध्ये कामाला जायचा. मात्र, कामाला जाण्याबाबत तसेच कामावरून परत घरी येण्याबाबत तो नातेवाइकांनाकाहीच सांगायचा नाही. गावी आल्यानंतरही तो दिवसभर घराबाहेर असायचा. रात्री उशिरा घरी येऊन जेवण केल्यानंतर तो परत घराबाहेर पडायचा.
त्याच्या घरापासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर गावातीलच डॉ. हणमंत पाटील यांचे पडके घर आहे. या घरात सरपण तसेच अन्य शेतीकामाच्या वस्तू ठेवल्या जातात. सुनील रात्री घरातून बाहेर पडला की, या पडक्या घरात झोपायचा. त्यासाठी त्याने एक चादर, चटई आणि रग त्याठिकाणी आणून ठेवली होती. या घराला बाहेरून कडी, कुलूप असते. त्यामुळे सुनीलने घराच्या पाठीमागील भिंतीला येण्या-जाण्यासाठी भगदाडही पाडले होते.
पंधरा दिवसांपूर्वी सुनील पुण्याहून गावी आला होता. सुमारे आठ दिवसांपूर्वी रात्री जेवण करून तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर दुसºया दिवशी सकाळी तो घरी परत आला नाही. तो पुण्याला नोकरीच्या ठिकाणी गेला असेल, असे समजून कुटुंबीयांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला नाही.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी डॉ. हणमंत पाटील यांच्या पडक्या घरातून उग्र वास येत असल्यामुळे परिसरातील काही ग्रामस्थांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले. त्यांना घराच्या पाठीमागील भिंतीस भगदाड पडल्याचे दिसले. ग्रामस्थांनी आत जाऊन पाहिले असता त्यांना गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला.
आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पोलिसांना माहिती दिली. .
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कºहाड तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक क्षीरसागर, उपनिरीक्षक भापकर यांच्यासह कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. सुनीलच्या आत्महत्येचे कारण रविवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. याबाबतची नोंद कºहाड तालुका पोलिसांत झाली आहे.

Web Title: Discovered in the fall suicides week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.