पॅरामिलिटरी संघाची पालकमंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:38 AM2021-03-05T04:38:52+5:302021-03-05T04:38:52+5:30
मसूर : सातारा जिल्हा आजी-माजी पॅरामिलिटरी कल्याण संघाच्या सदस्यांनी सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या ...
मसूर : सातारा जिल्हा आजी-माजी पॅरामिलिटरी कल्याण संघाच्या सदस्यांनी सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली. घरपट्टी माफ व्हावी, तसेच पॅरामिलिटरीच्या जवानांना अनेक सुविधा मिळत नाहीत, त्या मिळाव्यात, यासह अन्य विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी माजी सैनिक संदीप सावंत तसेच आजी-माजी पॅरामिलिटरी कल्याण संघाचे अध्यक्ष माणिकराव कदम, उपाध्यक्ष रामचंद्र पवार, सचिव सचिन शिंदे, खजिनदार रामचंद्र जाधव यांच्यासह संघाचे सदस्य उपस्थित होते.
मुख्य बाजारपेठेत पार्किंगची समस्या
कऱ्हाड : येथील मुख्य बाजारपेठेत दिवसेंदिवस पार्किंगची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेलगत पालिका मालकीच्या रिकाम्या जागेत पे अॅन्ड पार्क ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे. पार्किंगची समस्या यशवंत हायस्कूलपासून चावडी चौकापर्यंत आणि चावडी चौकापासून कन्या शाळेपर्यंत पाहायला मिळते. सम-विषम पार्किंग असले तरी विठ्ठल चौकासह बाजारपेठेलगत असणाऱ्या पालिकेच्या रिकाम्या जागेत पार्किंगची व्यवस्था झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे.
अशोकराव पाटील यांचा कऱ्हाडात सत्कार
कऱ्हाड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर वाहनधारक प्रतिनिधींची बैठक झाली. वाहन प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष सतीश पवार व सदस्यांच्याहस्ते यावेळी प्रियदर्शनी वाहतूक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अशोकराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रियदर्शनी वाहतूक संघटनेमार्फत वाहन प्रतिनिधींना त्यांच्या कामामध्ये सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी अशोकराव पाटील यांनी दिली. प्रियदर्शनी संघटनेच्या सदस्यांसह वाहनधारक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
उंडाळेच्या सरपंचांसह उपसरपंचांचा सत्कार
कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील माळी गल्लीच्यावतीने नवनिर्वाचित सरपंच संगीता माळी, उपसरपंच बापूराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बबनराव मोहिते, हनुमंत माळी, बाळकृष्ण लोखंडे, जगन्नाथ माळी, मंजुषा माळी, पूनम मोहिते, लता माळी, नीलम चाळके, सीमा माळी, रेखा माळी, संतोष माळी, राजेंद्र माळी, श्यामराव लोखंडे, अरुण साळुंखे, बाबासाहेब मोहिते, जगदीश चाळके, सुनील माळी, गणेश माळी उपस्थित होते.
यावेळी संगीता माळी व उपसरपंच बापूराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जगन्नाथ माळी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले
पोतलेच्या सरपंचपदी शंकर पाटील यांची निवड
कुसुर : पोतले, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शंकर पाटील, तर उपसरपंचपदी अविनाश गुरव यांची बिनविरोध निवड झाली. निवडीसाठी झालेल्या सदस्यांच्या बैठकीत नऊपैकी बहुमत प्राप्त गटाचे सहा सदस्य उपस्थित होते. अशोक पाटील, प्रमिला पाटील, आस्लेषा शिंदे, विजया सुतार आदी नवनिर्वाचित सदस्यांचा बाजार समिती संचालक अशोकराव पाटील-पोतलेकर, विलासराव पाटील, अंकुश नांगरे, वैशाली माळी, रामचंद्र पाटील, दिलीप शिंदे, विजय पाटील, अनिल माळी, अण्णासाहेब काळे, दिलीप पाटील, महादेव गुरव, हनुमंत पाटील, संतोष पवार, सुनील पाटील, अनिल मोहिते यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक कोळेकर व ग्रामविकास अधिकारी एस. एस. धाबुगडे यांनी काम पाहिले.