स्ट्रॉबेरी, भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव : वाई तालुक्यात करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:30 PM2018-12-14T22:30:35+5:302018-12-14T22:32:22+5:30

वाई तालुक्यातील बदलत्या हवामानामुळे स्ट्रॉबेरीसह भाजीपाला यावर पडणाऱ्या करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण झाला आहे

Diseases of strawberries and vegetables: Harvesting of wheat, tan, white rice in Y Taluka | स्ट्रॉबेरी, भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव : वाई तालुक्यात करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण

वाई तालुक्यात स्ट्रॉबरी पिकावर रोगाचा प्रादुर्भात झाला आहे. वाई तालुक्यात कारले पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पन्नावर परिणाम

पसरणी : वाई तालुक्यातील बदलत्या हवामानामुळे स्ट्रॉबेरीसह भाजीपाला यावर पडणाऱ्या करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. स्ट्रॉबेरीसह भाजीपाला वाचविण्याचे आव्हानच रोगांनी दिल्याने शेतकºयांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

वाईच्या पश्चिम भागात गोळेवाडी, गोळेगावसह कोंडवली या गावांमधून स्ट्रॉबेरीसह भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्याने रोगराईचा बिमोड हवा तसा झालेला नाही, त्यातच वारंवार बदल होत असल्याने हवामानामुळे सध्या या भागातील स्ट्रॉबेरीसह कारले, तोडका, कोबी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो या पिकांवर तांबेरा, पांढरी भुरी, करपा, दावण्या, स्पॉट या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झालेला आहे.

पश्चिम भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी पोषक वातावरण असल्याने महाबळेश्वर, पाचगणी भागातील शेतकºयांनी भाडेतत्त्वावर शेती घेऊन स्ट्रॉबेरी पिकाचा मदरप्लांट राबविला आहे; परंतु यावर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने विविध प्रकारच्या रोगांनी डोके वर काढले आहे.

स्ट्रॉबेरीसाठी लाखो रुपये खर्च करावा लागतो. इतर भाज्यांच्या मानाने या पिकांवर खर्च करावा लागत असला तरीही या पिकाला देशाबाहेर मागणी असल्याने त्यामधून उत्पन्न चांगले येत असल्याने शेतकरी या पिकावर चांगली मेहनत घेतात. त्यामुळे अशा रोगांची लागण झाल्यास उत्पन्नावर विपरित परिणाम होऊन आर्थिक गणित पूर्णपणे ढासळते. मालाची प्रतवारी कमी झाल्यास बाहेरगावी पाठविताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. परिणामी शेतकºयांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाकडून जास्तीत-जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा व तसा कृषी विभागाने पाठपुरावा करून शासन दरबारी सादर करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. शेतकºयांना दरवर्षी विकास सेवा सोसायटी, बँकांकडून कर्ज घेऊन शेतांची डागडुजी करावी लागते. यावर्षी स्ट्रॉबेरीसह सर्वच भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने भाजीपाला करण्यासाठी झालेला खर्च जरी निघाला तरी समाधान मानावे लागणार आहे.

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे...
कृषी विभागाने या पिकांची पाहणी करून शेतकºयांना पीक संरक्षणाविषयी व रोगांच्या बिमोडासाठी औषधांची फवारणी कशी करावी, यासाठी मार्गदर्शन करून व होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

 

वाई तालुक्यातील बदलत्या हवामानाचा स्ट्रॉबेरीसह भाजीपाला उत्पन्न घेणाºया शेतकºयांनी अंदाज घेऊनच लागण करावी, तसेच त्यासाठी कृषी विभागाने तालुकास्तरीय मार्गदर्शनाचे कार्यक्रम राबवून योग्य प्रबोधन व्हावे.
- जितेंद्र गोळे, शेतकरी, गोळेगाव, ता. वाई

 

Web Title: Diseases of strawberries and vegetables: Harvesting of wheat, tan, white rice in Y Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.