कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:32 AM2021-05-03T04:32:45+5:302021-05-03T04:32:45+5:30
रामापूर : पाटण शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने संचारबंदी लागू केली असली तरी कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत ...
रामापूर : पाटण शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने संचारबंदी लागू केली असली तरी कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत नाही. तो रोखण्यासाठी पाटण नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी कसून प्रयत्न करत आहेत. पण, अपेक्षित यश येत नाही. म्हणून पाटण गर्दीची ठिकाणे, मंदिरे, चौक, बसस्थानक, बाजारपेठ आदी ठिकाणे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
कोरोनाचा महाभयंकर विळखा पडला आहे. त्याचा दुष्परिणाम देश, राज्य ते अगदी जिल्हा, तालुक्यातील वाडीवस्तीवर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात पाटण शहरात कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. तो कमी करण्यासाठी नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी कसून प्रयत्न करत आहेत. त्याला नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे अन्यथा त्याला यश येणार नाही.
पाटण शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भलेही यापूर्वी याबाबत खबरदारी अथवा उपाययोजना याचे गांभीर्य नसणाऱ्यांनी निदान आता तरी याचे गांभीर्य ओळखून आवश्यक ती काळजी घेऊन घरीच बसणे हा सर्वोत्तम पर्याय निवडणे आता गरजेचे झाले आहे.
हे वैयक्तिक, कौटुंबिक व सार्वजनिक हिताचे ठरणार आहे. पाटण तालुक्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या व्यापारी बाजारपेठा बंद आहेत. त्याचवेळी अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीतपणे सुरू आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा त्याठिकाणच्या आवश्यक खबरदारी व उपाययोजना यासाठी व्यापारी तसेच नागरिक योग्य ती काळजी घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलीस व संबंधित यंत्रणांवरचा ताण वाढत आहे. मात्र, अद्यापही रस्त्यावर विनाकारण येणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी होणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अन्यथा यातूनही इतरांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, याचेही भान राखणे आवश्यक आहे. यामुळे पाटण नगरपंचायतीच्यावतीने सार्वजनिक ठिकाण असलेले मंदिरे, चौक, बसस्थानक आदी ठिकाणे निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. एवढ्यावरच न थांबता प्रत्येक वार्डमध्येही ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे म्हणून ते व्हावी, अशी मागणी पाटण शहरातील नागरिक करत आहेत.
फोटो प्रवीण जाधव यांनी शनिवारी किंवा रविवारी फोटो मेल केला आहे.
पाटण शहरातील मंदिराबाहेर औषध फवारणी करून शहर निर्जंतुकीकरण केले जात आहे. (छाया : प्रवीण जाधव)