कुडाळमध्ये निर्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:42+5:302021-05-06T04:41:42+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्येला प्रतिबंध करण्यासाठी कुडाळ येथे बुधवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून निर्जंतुकीकरणासाठी ...
कुडाळ : जावळी तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्येला प्रतिबंध करण्यासाठी कुडाळ येथे बुधवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करण्यात आली.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, सरपंच सुरेखा कुंभार,उपसरपंच सोमनाथ कदम व सर्व सदस्य उपस्थित होते.
कुडाळ आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या आढळत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाच्या माध्यमातून संपूर्ण कुडाळ गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
(चौकट:)
उपक्रमाचे ग्रामस्थांमधून समाधान
नागरिकांसाठी आरोग्यदायी उपक्रम
कुडाळ गाव संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच सोमर्डी ता.जावळी येथील नागरिकांसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमाने संपूर्ण गावात सॅनिटायजर व मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अशा स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
०५कुडाळ०२
फोटो : कुडाळ येथे निर्जंतुकीकरण फवारणी प्रारंभप्रसंगी उपसभापती सौरभ शिंदे, उपसरपंच सोमनाथ कदम व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.