आता जागेवरच तंट्यांची प्रकरणे निघणार निकाली; जिल्ह्यात फिरत्या लोकअदालतीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:53+5:302021-08-13T04:44:53+5:30

सातारा : जिल्ह्यामध्ये आजपासून ३० ऑगस्टपर्यंत फिरत्या लोकअदालतीला प्रारंभ झाला आहे. या फिरत्या लोकअदालतीकरिता निवृत्त न्यायाधीश राजेपांढरे यांची नियुक्ती ...

Disputes will now be settled on the spot; Mobile Lok Adalati started in the district | आता जागेवरच तंट्यांची प्रकरणे निघणार निकाली; जिल्ह्यात फिरत्या लोकअदालतीला सुरुवात

आता जागेवरच तंट्यांची प्रकरणे निघणार निकाली; जिल्ह्यात फिरत्या लोकअदालतीला सुरुवात

Next

सातारा : जिल्ह्यामध्ये आजपासून ३० ऑगस्टपर्यंत फिरत्या लोकअदालतीला प्रारंभ झाला आहे. या फिरत्या लोकअदालतीकरिता निवृत्त न्यायाधीश राजेपांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या फिरते लोकअदालत वाहनाचे पूजन निवृत्त न्यायाधीश राजेपांढरे यांच्या हस्ते तर डायसचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. बी. देसाई यांनी दिली आहे.

सातारा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला सर्व जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ठ न्यायाधीश तसेच वकील संघाचे अध्यक्ष अरुण खोत, जिल्हा न्यायालयाचे व्यवस्थापक काळे, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक जोशी, विधीज्ञ, विधी स्वयंसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून फिरते लोकअदालत वाहन कोरेगावकडे रवाना करण्यात आले.

फिरते लोकअदालतीचे वाहन ९ तालुक्यांत फिरणार असून, तडजोडीआधारे गावात जाऊन प्रकरणे निकाली काढणार आहेत. यामध्ये गुरुवारी कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथे हे वाहन दाखल झाले आहे. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेच्या माध्यमातून फिरते लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवून तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा प्रभारी सचिव एस. बी. देसाई यांनी केले आहे.

दि. १४ रोजी माण तालुक्यातील मोगराळे, दि. १७ रोजी खुटबाब, दि. १९ रोजी मौजे फलटण तालुक्यातील जाधववाडी, दि. २१ रोजी खंडाळा तालुक्यातील अंधोरी, दि. २४ रोजी वाई तालुक्यातील सुरुर, दि. २६ रोजी जावळी तालुक्यातील सरताळे, दि. ३० रोजी कऱ्हाड तालुक्यातील मसूर, दि. १० रोजी कोरेगाव, दि. १२ रोजी खटाव, दि. १३ रोजी वावरहिरे, दि. १८ रोजी विडणी, दि. २० रोजी खेड, दि. २३ रोजी केंजळ, दि. २५ कुडाळ आणि दि. २७ रोजी उंडाळे याठिकाणी हे वाहन फिरणार आहे.

Web Title: Disputes will now be settled on the spot; Mobile Lok Adalati started in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.