विस्कळीत पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:56+5:302021-03-04T05:14:56+5:30
....................... कार्वे-शेणोली रस्त्याची दुरवस्था कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कार्वे ते शेणोली रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघातांची मालिका ...
.......................
कार्वे-शेणोली रस्त्याची दुरवस्था
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कार्वे ते शेणोली रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघातांची मालिका नेहमीच सुरू आहे. काही प्रवासी वाहनधारकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा असल्याने याकरिता हा रस्ता चाैपदरी बनविण्याची मागणी होत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन अपघातांची मालिका टाळण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारक प्रवाशांनी केली आहे.
.........................
घनकचऱ्यासाठी मशीन
कऱ्हाड : येथील पालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचऱ्यातील फळांचे बारीक तुकडे करण्याबरोबरच त्याच्या चाळण्यासाठीच्या सुमारे सहा लाख खर्चून दोन मशीन खरेदी करण्यात आल्या. कचऱ्यात येणाऱ्या सफरचंद, मोसंबी, डाळिंबाच्या सालींचे विघटन होण्यास विलंब होत होता. मात्र, या मशीनद्वारे ते बारीक झाल्याने लवकर विघटन होण्यास मदत होणार आहे.
................
कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी
कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असून, पोलिसांनी शिस्त लावाली, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. दिवसभर ही परिस्थिती असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
...................
नागरिक बिनधास्त
सातारा : सातारा शहराच्या विविध भागांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढत आहे. या युद्धात मनुष्यबळाची कमतरता जाणवत असताना, त्यांना नागरिकांनी घरात बसून सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र सातारकर सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करत आहेत. अनेकजण मास्कचाही वापर करत नाहीत. त्यामुळे अशा लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
...................
भाजी मंडई रस्त्यावर
सातारा : साताऱ्यातील राजवाडा परिसरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गर्दी वाढली आहे. त्यातच या परिसरात भाजी, फळ विक्रेते रस्त्याकडेला बसलेले असतात. या विक्रेत्यांना काहीवेळा पोलीस हुसकावून लावतात; पण पोलीस गेल्यानंतर ते पुन्हा येतात.
................
प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर
सातारा : सातारा नगरपालिकेने प्लास्टिकविरोधात चांगली मोहीम राबविली होती. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर वारंवार कारवाईही करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांवर वचक बसला होता. मात्र कोरोनाची साथ आलेली असल्याने प्रशासन या कामात व्यस्त आहेत. याचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. ग्राहकांनी मागणी नाही केली, तरी फळविक्रेते प्लास्टिक पिशव्या देत आहेत. त्यामुळे सरसकट कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.