प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:01+5:302021-07-23T04:24:01+5:30
कार्वे विभागामध्ये बेंदूर सण उत्साहात साजरा कार्वे : परिसरात बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी चिखलाच्या बैलाची मूर्ती ...
कार्वे विभागामध्ये बेंदूर सण उत्साहात साजरा
कार्वे : परिसरात बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी चिखलाच्या बैलाची मूर्ती हातगाड्यावर ठेवून ढोल-ताशांच्या गजरात गावातून त्याची मिरवणूक काढली. सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले आहे. यंत्राच्या साह्याने शेतकरी मशागत करीत असल्यामुळे बैल पाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या गावामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांकडेच बैल असून, गुरुवारी बेंदूर सणानिमित्त शेतकऱ्यांनी बैलांची सजावट करून तसेच त्यांचे पूजन करून सण साजरा केला. कारागिरांनी तयार केलेल्या चिखलाच्या बैलांची पूजाही करण्यात आली. पूर्वी परिसरात शेतीसाठी घरोघरी बैल पाळले जात होते. मात्र, सध्या हे प्रमाण कमी झाल्याचे शेतकरी रमेश थोरात यांनी सांगितले.
महामार्गाच्या दुभाजकांची स्वच्छता गरजेची
कऱ्हाड : शहर परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकात सुशोभिकरणासाठी फुलझाडे लावण्यात आली आहेत. सद्यस्थितीत स्वच्छता आणि देखरेखीअभावी दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. या दुभाजकात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गवत व अनावश्यक झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे फुलझाडांचे नुकसान होत आहे. तसेच गवतामुळे सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना धोका निर्माण होत आहे. दुभाजकांची स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.
जळव येथे ग्राम सचिवालयाचे उद्घाटन
पाटण : बाळासाहेब ठाकरे मातोश्री योजनेमधून जळव, ता. पाटण येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे यांच्या हस्ते झाले. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होत आहे. अभिजित पाटील, नामदेवराव साळुंखे, किशोर बारटक्के, श्रीकांत सोनवले, माणिक पवार, सुहास सपकाळ, सचिन कदम, अमोल घाडगे, सरपंच शीतल कदम, उपसरपंच राजू कदम आदी उपस्थित होते. नामदेवराव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. राजू कदम यांनी आभार मानले.