तैलिक महासभेकडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:44 AM2021-08-21T04:44:07+5:302021-08-21T04:44:07+5:30

रामापूर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पश्चिम यांचे अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र सातारा संस्थेमार्फत ...

Distribution of essential materials from Tailik Mahasabha | तैलिक महासभेकडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप

तैलिक महासभेकडून जीवनावश्यक साहित्याचे वाटप

Next

रामापूर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पश्चिम यांचे अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र सातारा संस्थेमार्फत कोकण पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आली मदत नाही तर माणुसकीच्या कर्तव्य भावनेतून पूरग्रस्तांना मदतीचा हातभार लावण्यात आला, असे संस्थेचे अध्यक्ष राम पगडी यांनी सांगितले

पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. प्रामुख्याने चिपळूण आणि परिसरातील गावे पूर्ण पाण्याखाली गेली. लोकांचे घरातील अन्नधान्य, कपडालत्ता, घरातील किमती वस्तू, व्यापारी उद्योजकांचे साहित्य, मशीनरी त्यांचे अतोनात नुकसान झाले, ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांचे गांभीर्य लक्षात येत होते. या सर्व बांधवांना आजच्या घडीला मदतीची आवश्यकता होती. या परिस्थितीचा विचार करून श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. यासाठी जिल्हाध्यक्ष संजय शेडगे, पोपटराव प्रदीप देशमाने, राजेंद्र झगडे, संस्थेचे पाटण प्रतिनिधी राजेंद्र राऊत, राजेंद्र तांबे, अमोल महाडिक आदी पदाधिकारी समाजातील दानशूरांनी मोलाचे योगदान दिले.

Web Title: Distribution of essential materials from Tailik Mahasabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.