पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना खाऊचे वाटप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:40 AM2021-05-21T04:40:47+5:302021-05-21T04:40:47+5:30
कराड : येथील पालिकेचे स्वच्छता कर्मचारी कोरोना महामारी संकटातही जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. त्यांच्या या ...
कराड : येथील पालिकेचे स्वच्छता कर्मचारी कोरोना महामारी संकटातही जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. त्यांच्या या या कामाची दखल घेऊन वीरशैव लिंगायत समाजाने त्यांना नुकतेच खाऊचे वाटप केले. मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, मिलिंद शिंदे, आर. डी. भालदार यांच्याकडे ५०० बिस्कीट पुडे सुपूर्द केले.
महात्मा बसवेश्वर यांची नुकतीच जयंती झाली. मात्र कोरोना संकटामुळे समाजबांधवांनी सार्वजनिक कार्यक्रमांचा खर्च टाळून बसवेश्वर जयंती घरगुती साजरी केली. त्याऐवजी समाजबांधवांनी कोरोना महामारी काळात ''फ्रंट लाइन वर्कर'' म्हणून काम करणाऱ्यांसाठी मदतीचा हात दिला आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यापैकीच एक म्हणून पालिका कर्मचाऱ्यांना खाऊवाटप करण्यात आला.
वीरशैव लिंगायत समाजाचे कार्यकर्ते दिलीप चिंचकर, संजय शेटे, सुनील महाजन, दत्तात्रय तारळेकर, महेश शेटे, प्रा. पी. व्ही. सुकरे, शिवाजी माळी यावेळी उपस्थित होते. त्यांनी सदरचा खाऊ वाटप केले. पालिका कर्मचाऱ्यांनीही लिंगायत समाजाने जपलेल्या सामाजिक बांधिलकी बद्दल समाधान व्यक्त केले.
फोटो
कराड येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी खाऊचे वाटप करण्यात आले.