आनंदराव पाटील यांच्याकडून ग्रामपंचायतींना सॅनिटायझर मशीनचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:49 AM2021-02-20T05:49:20+5:302021-02-20T05:49:20+5:30
कऱ्हाड : माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यातर्फे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सॅनिटायझर मशीन, थर्मल गन, ऑक्सिमीटर, मास्क, पीपीई ...
कऱ्हाड : माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यातर्फे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सॅनिटायझर मशीन, थर्मल गन, ऑक्सिमीटर, मास्क, पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदे, शिवाजी शिक्षण संस्था, कऱ्हाडचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
देशावर कोविडचे संकट उभे राहिले आहे, या अनुषंगाने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सॅनिटायझर मशीन, थर्मल गन, ऑक्सिमीटर, पीपीई किट, मास्क यांचे एकत्रित किट तयार करून त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राथमिक स्वरूपात ग्रामपंचायत धोंडेवाडी, मुंढे, विजय नगर या ग्रामपंचायतींना डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कऱ्हाड तालुक्यातील मान्यवर तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ :
कऱ्हाड येथे ग्रामपंचायतींना सॅनिटायझर मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुरेश भोसले, जयंत पाटील आदी उपस्थित होते.