कोरोना रोखण्यासाठी सॅनिटायझर, मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:54+5:302021-04-14T04:35:54+5:30
ढेबेवाडीः पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागल्याने गावोगावी कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना आखल्या जाऊ लागल्या आहेत. ...
ढेबेवाडीः पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागल्याने गावोगावी कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना आखल्या जाऊ लागल्या आहेत. अशाचप्रकारे तालुक्यातील खळे गावातील संजय शांताराम कचरे आणि सचिन आनंदराव कचरे या तरुणांनी स्वखर्चाने संपूर्ण गावामध्ये सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले आहे.
खळे गावामध्ये दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे या तरुणांनी योग्यवेळी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, हे दोन्ही तरुण मुंबईमध्ये स्थायिक झाले आहेत. गावामध्ये कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्यासाठी त्यांनी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. अशावेळी इतर नागरिकांनी देखील मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करतेवेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप कचरे-पाटील, अनिल सुतार, किरण कचरे, अतुल साखरे, गणेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते
फोटो ओळ : पाटण तालुक्यातील खळे गावामध्ये सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.