जिल्ह्यात दिग्गज नेत्यांचा प्रचारासाठी राबता

By admin | Published: October 8, 2014 10:29 PM2014-10-08T22:29:57+5:302014-10-08T23:02:17+5:30

तोफा धडाडणार : प्रत्येक मतदारसंघात रणधुमाळी

In the district, campaign for veteran politicians | जिल्ह्यात दिग्गज नेत्यांचा प्रचारासाठी राबता

जिल्ह्यात दिग्गज नेत्यांचा प्रचारासाठी राबता

Next

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री तसेच राज्य पातळीवरील नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. भाजपचे तीन केंद्रीय मंत्री विविध मतदारसंघांत सभा घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या दोन सभा होणार आहेत. प्रचाराची सांगता सभा राष्ट्रवादीने साताऱ्यात घेणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे नेतेही ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रचारार्थ तळ ठोकून आहेत.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील नेत्यांच्या तोफा प्रचारसभांमधून धडाडू लागल्या आहेत. ‘सातारा-जावळी’चे भाजपचे उमेदवार दीपक पवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची गुरुवारी, दि. ९ रोजी दुपारी
तीन वाजता गांधी मैदानावर होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘कऱ्हाड उत्तर’चे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी, दि. ९ रोजी दुपारी बारा वाजता उंब्रज येथे आर. आर. पाटील यांची सभा होणार आहेत.
‘सातारा-जावळी’चे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शुक्रवार, दि. १० रोजी सकाळी अकरा वाजता कुडाळ येथे अजित पवार यांची सभा होणार आहे.
‘कऱ्हाड उत्तर’मधील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची रविवार, दि. १२ रोजी सभा होणार आहे.
पाटणचे भाजपचे उमेदवार दीपक महाडिक यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री उमा भारती यांची दि. ११ अथवा १२ रोजी पाटण येथे सभा होणार आहेत. याची घोषणा दोन दिवसांतच होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

मोदींची सोमवारी सभा
पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी ‘कऱ्हाड दक्षिण’चे भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ सोमवार, दि. १३ रोजी तारीख दिली आहे. कऱ्हाड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर ही सभा होणार आहेत. दरम्यान, मोदी यांच्या प्रचारसभेचा कार्यक्रम भाजप जिल्हा कार्यकारिणीकडे आला असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: In the district, campaign for veteran politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.