जिल्हास्तरीय मॅरेथॉनने शहीद शशिकांत मोरेंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 07:11 PM2017-10-08T19:11:54+5:302017-10-08T19:13:32+5:30
जिल्ह्यास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून शहीद पोलिस उपनिरीक्षक शशिकांत मोरे यांना जावळी तालुक्यात अभिवादन करण्यात आले. स्पर्धेत दीड हजार तरुण सहभागी झाले.
मेढा : जिल्ह्यास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून शहीद पोलिस उपनिरीक्षक शशिकांत मोरे यांना जावळी तालुक्यात अभिवादन करण्यात आले. स्पर्धेत दीड हजार तरुण सहभागी झाले.
यावेळी शशिकांत मोरे अॅकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, उद्योजक विजय शेलार, जावळी पंचायत समितीचे सभापती अरुणा शिर्के, उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ, तहसीलदार रोहिणी आखाडे, गटविकास अधिकारी सतीश बद्धे, सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, सावली गावचे सुपुत्र शहीद शशिकांत मोरे यांचे बलिदान जावळीकरांसाठी प्रेरणादायी आहे. सावली येथे उभारण्यात येणाºया मोरे यांच्या स्मारकासाठी पोलिस कल्याण निधीतून मदत केली जाईल. मोरे शहीद झाले त्या गडचिरोलीत आजही युद्धजन्य परिस्थिती आहे. सीमेवर शत्रू ओळखता येतो. पण नक्षलवादी क्षेत्रात शत्रू ओळखणे अवघड आहे.
माजी आमदार सपकाळ म्हणाले, ह्यशहीद शशिकांत मोरे यांच्या बलिदानाने जावळी तालुक्यातील एक लढवय्या शुराला मुकावे लागले. सावली येथे उभारले जात असलेल्या स्मारकासाठी समाजातून सहकार्य मिळावे.
स्पर्धेत सुमारे दीड हजार स्पर्धक सहभागी झाले. यावेळी खुल्या पुरुष गटात अनुक्रमे स्वप्नील सावंत, आदिनाथ भोसले, आकाश हिरवे. खुला गट महिलांमध्ये स्नेहल हिरवे, आकांक्षा शेलार, प्रियांका टिंगरे.
१४ वर्षांखालील पुरुष गट गणेश शिंदे, सूरज गावित, रोहन गाढवे. सतरा वर्षांखालील मुली : विशाखा साळुंखे, प्रतीक्षा मांढरे, अश्विनी मांढरे.
सतरा वर्षांखालील मुले : सूरज कोकरे, बाळू पुकळे, प्रतीक उंबरकर. चौदा वर्षांखालील मुली : रोशनी पाटणकर, ज्ञानी चिकणे, वैष्णवी मोरे यांनी यश मिळविले.
विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शहीद मोरे यांचे वडील तुकाराम मोरे, वीरमाता कांताबाई उपस्थित होते. सुरेश मोरे यांनी स्वागत केले. अशोक लकडसे यांनी सूत्रसंचालन केले. शामराव जुनघरे यांनी आभार मानले.