जिल्ह्यातील पोलीस ठाणी व्हॉट्स अ‍ॅपवर

By admin | Published: December 17, 2015 10:42 PM2015-12-17T22:42:48+5:302015-12-17T23:00:28+5:30

आपल्या तक्रारी, माहिती, अडचणी यापुढे व्हिडीओ, फोटोसह घरबसल्या पोलिसांकडे पाठवता येणार आहेत.

In the district police station's What's App | जिल्ह्यातील पोलीस ठाणी व्हॉट्स अ‍ॅपवर

जिल्ह्यातील पोलीस ठाणी व्हॉट्स अ‍ॅपवर

Next

सातारा : राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशान्वये आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी, सर्व उपविभागीय कार्यालये आणि नियंत्रण कक्ष येथे टॅबलेट्स पुरवण्यात आली असून, त्यामध्ये व्हॉट्स अ‍ॅप हे अ‍ॅप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे आपल्या तक्रारी, माहिती, अडचणी यापुढे व्हिडीओ, फोटोसह घरबसल्या पोलिसांकडे पाठवता येणार आहेत.
या सुविधेमुळे समाजास उपद्रवी ठरणारे समाजकंटकाच्या बेकायदेशीर कामाला वेळेत आळा घालता येणार आहे. सर्वसामान्य जनतेशी संपर्क वाढवून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे.
पोलीस कार्यालये आणि ठाणी व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. पोलीस नियंत्रण कक्ष, सातारा-९०१११८१८८८, उपविभागीय कार्यालय सातारा - ९१३०३५३००८, उपविभागीय कार्यालय कराड - ९६८९२२२३४५, उपविभागीय कार्यालय वाई - ९१४५६३५३८९, उपविभागीय कार्यालय कोरेगाव - ८६०५०३८१००, उपविभागीय कार्यालय दहिवडी - ९१३०८३०८३१, उपविभागीय कार्यालय फलटण- ७०८३५७२१३३, उपविभागीय कार्यालय पाटण - ९१४५६७०५१७, सातारा शहर पोलीस ठाणे - ९१७२८३१९८९, शाहूपुरी पोलीस ठाणे - ९१४६०४२१००, सातारा तालुका पोलीस ठाणे - ८२७५३८२४०१, बोरगाव पोलीस ठाणे - ७३५०८५११००, कराड शहर पोलीस ठाणे - ७०८३९४८०३५, कराड तालुका पोलीस ठाणे - ७६२०९२२३७७, तळबीड पोलीस ठाणे - ९६७३८३२५८२, उंब्रज पोलीस ठाणे - ७०८३१६१९९४, वाई पोलीस ठाणे - ७०५७६१११००, महाबळेश्वर पोलीस ठाणे - ७०५७०५२९७७, पाचगणी पोलीस ठाणे - ८४२१८५३४१९, मेढा पोलीस ठाणे - ९४०३४६३५१९, भुर्इंज पोलीस ठाणे - ९१४६५६७९३८, कोरेगाव पोलीस ठाणे - ९६०४१०२२३३, पुसेगाव पोलीस ठाणे - ९८५०६०२१६६, रहिमतपूर पोलीस ठाणे - ९०७५९२६९३९, वाठार पोलीस ठाणे - ९०४९४५४१६९, वडूज पोलीस ठाणे - ९०११४४५१००, दहिवडी पोलीस ठाणे - ७७५८०४१२००, म्हसवड पोलीस ठाणे- ७०३८९३६९६९, औंध पोलीस ठाणे - ८९७५४१४२०९, फलटण शहर पोलीस ठाणे - ९६८९९०११००, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे - ८९७५४२६१००, लोणंद पोलीस ठाणे - ८९७५०८११००, खंडाळा - ९९२२१००६२०, शिरवळ - ९६०४२५९२५७, पाटण - ९९२२३६३१८३, कोयनानगर - ९६५७६५६४६०, ढेबेवाडी - ८३९०८४७९५१. (प्रतिनिधी)

Web Title: In the district police station's What's App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.