जिल्हाध्यक्ष बदलायचाय; होणार कोण?

By admin | Published: February 27, 2017 11:34 PM2017-02-27T23:34:10+5:302017-02-27T23:34:10+5:30

कऱ्हाडात घडतंय बिघडतंय : ‘हमको भी गमने मारा, तुमको भी गमने मारा, इस गमको मार डालो..’

The district president wants to change; Who will be? | जिल्हाध्यक्ष बदलायचाय; होणार कोण?

जिल्हाध्यक्ष बदलायचाय; होणार कोण?

Next



प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची पुरती वाताहत झाली. दोन अंकी आकडाही गाठू न शकलेल्या काँगे्रस नेत्यांवर आत्मचिंतनाची वेळ आलीय; पण या निकालानंतर कार्यकर्त्यांच्यात अन् सोशल मीडियावर अनेक चर्चांबरोबरच काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या बदलाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे; पण जिल्हाध्यक्ष बदलायचाच म्हटलं तर ज्यांचा याबाबतचा छुपा आग्रह होता त्यांच्या मतदार संघातही काँगे्रसची वाटच लागलीय.
‘हमको भी गमने मारा, तुमको भी गमने मारा, इस गमको मार डालो...’ असंच प्रत्येक काँगे्रस कार्यकर्त्यांना वाटतंय खरं; पण काँगे्रसचं हे दु:ख नेमकं कोण दूर करणार, हा खरा प्रश्न आहे.
एकेकाळी सातारा जिल्हा हा काँगे्रसचा बालेकिल्ला होता म्हणे. पण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून येथे घड्याळाचा गजर वाढला. काँगे्रसच्या ‘हाता’ला एक-दोन विधानसभा मतदारसंघ लागले आहेत; पण तेथेही सध्या पक्षाची परिस्थिती चांगली दिसत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. सातारा जिल्हा हा दिवंगत यशवंतराव चव्हाणांचा, दिवंगत किसन वीर आबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता अलीकडे तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातोय. खरंतर यशवंतराव अन् किसन वीर आबांचा वारसा सांगूनच पृथ्वीबाबा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले; पण धर्मनिरपेक्ष धोरणाचा त्यांच्याच जिल्ह्यात आज पुरता बोजवारा उडालेला दिसतोय. राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर तर वाढतच चाललाय; पण भाजपचं ‘कमळ’ही काँगे्रसच्या बरोबरीत येऊन
बसलंय.
वास्तविक, यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात त्यांच्या कर्मभूमीत भाजपचा नगराध्यक्ष होतो त्याचवेळी जिल्ह्यातील काँगे्रसच्या नेत्यांनी काळाची पावले ओळखायला हवी होती. चिंतन मेळावे घेऊन भाजपला रोखण्यासाठी व्यूहरचना करायला हवी होती. मात्र, मुंबई अन् दिल्लीच्या राजकारणात अडकलेल्या बाबांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. देशाच्या परमाणु धोरणावर चर्चा करणारे बाबा, देशाचे परराष्ट्र धोरण युनोत मांडणारे बाबा सध्या गल्लीतल्या राजकारणात अडकलेले दिसतात; पण त्यांना योग्य मार्ग सध्या सापडताना दिसेना. देश, विदेशातील प्रश्नांवर बोलून स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही, हे आता त्यांच्या लक्षात आले असावे.
स्वातंत्र्यानंतर अगदी कालपरवापर्यंत सातारा जिल्ह्यात भाजपचं चिन्ह कधी रुजलेलं पाहायला मिळालं नाही; पण आज काँगे्रसमधीलच सुंदोपसुंदीमुळे काँगे्रस कार्यकर्तेच काँगे्रस विचारापासून दूर गेल्याचे दिसले.
आता चिंतन मेळावे, पराभवाचे परिमार्जन, विश्लेषण चालू होईल. त्यातून जिल्हाध्यक्ष बदलासारखा विषयही समोर येईल; पण जिल्ह्यात काँगे्रसची पूर्ण वाताहत झाली असताना ही नौका नेमकी कोणाच्या खांद्यावर पेलणार? कारण या निवडणुकांत एकाही काँग्रेस नेत्याचा खांदा मजबूत राहिल्याचे दिसत नाही. म्हणूनच तर ‘कोणी म्हटले म्हणून मी राजीनामा देणार नाही. माझा निर्णय बाबा घेतील’ असे आनंदराव पाटील सांगताना दिसतात.
जयाभाऊंचा ‘भाव’ उतरला
काँगे्रसचा एक आक्रमक नेता म्हणून जिल्ह्यात माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे नाव घेतले जायचे; पण मध्यंतरी त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रकार झाला. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही त्यांना त्यांच्या विधानसभा मतदार संघात झटका बसल्याने जयाभाऊंचा भाव सध्या उतरला आहे. जिल्ह्याचे नेते होऊ पाहणारे जयाभाऊ फक्त एका जिल्हा परिषद गटापुरतेच उरलेले दिसतात.

मदनदादाही वरमले
वाईचे माजी आमदार आणि किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले हे देखील जिल्ह्यातील राष्ट्रीय काँगे्रसचे ज्येष्ठ नेते; पण आमदार मकरंद आबांनी त्यांना जेरीस आणले आहे. आमदारकी तर दूरच पण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही आबांनी दादांना घाईला आणलेय. त्यामुळे ते तरी जिल्ह्याची जबाबदारी कसे पेलणार असा प्रश्न आहे.

Web Title: The district president wants to change; Who will be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.