राज्यस्तरीय शालेय गुणांकनामध्ये जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:35+5:302021-06-09T04:48:35+5:30

सातारा : विविध शालेय उपक्रमांमध्ये संपूर्ण राज्यात झालेल्या गुणांकनामध्ये सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे, ...

District ranks second in Maharashtra in state level school grading! | राज्यस्तरीय शालेय गुणांकनामध्ये जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक!

राज्यस्तरीय शालेय गुणांकनामध्ये जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक!

Next

सातारा : विविध शालेय उपक्रमांमध्ये संपूर्ण राज्यात झालेल्या गुणांकनामध्ये सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. दरम्यान, यामध्ये प्रथम क्रमांक मुंबई जिल्ह्याचा असून तो शहरी भाग आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा विचार करता सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शाळा सिद्धी, शालेय पोषण, मध्यान्ह आहार, दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयीसुविधा, यू-डायस, डायट, एससीईआरटी अशा विविध उपक्रमांना राज्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला गुणांकन देण्यात आले. सर्व जिल्ह्यांचे गुणांकन प्राप्त झाले आहे. हे संपूर्ण गुणांकन ६०० पैकी आहे. शाळेची सुरक्षितता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, डिजिटल उपक्रम आदी अनेक बाबींना गुणांकन करण्यात आले.

यामध्ये ६०० पैकी सातारा जिल्ह्याने ४२७.८१ इतके गुण पटकावून दुसरा क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे. यामध्ये प्रशासकीय व्यवस्था, संपूर्ण शालेय नियंत्रण प्रणाली इत्यादी सर्वच बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वाध्याय उपक्रमांमध्येसुद्धा सातारा जिल्ह्याने नुकतेच धवल यश मिळवले होते.

या संपूर्ण यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी, सर्व संबंधित अधिकारी, शिक्षक, इतर कर्मचारी तसेच सर्व उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या आणि मनापासून आनंददायी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे.

कोरोनाच्या काळातसुद्धा ऑनलाइन शिक्षण प्रणाली आणि इतर उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविले जात आहेत. संकटावर मात करीत कधी थेट भेटी तर कधी संगणक प्रणालीतून संपूर्ण शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे, ही गोष्ट अभिमानास्पद आहे, असे देखील गौडा यांनी आवर्जून नमूद केले आहे.

Web Title: District ranks second in Maharashtra in state level school grading!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.