‘स्वाध्याय’ उपक्रमात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:40 AM2021-03-31T04:40:11+5:302021-03-31T04:40:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ...

The district ranks second in the state in the 'Swadhyay' initiative | ‘स्वाध्याय’ उपक्रमात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

‘स्वाध्याय’ उपक्रमात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वाध्याय उपक्रमात जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ५६ हजार ४८१ मुलांनी सहभाग नोंदविला आहे. पहिली ते दहावीच्या मुलांनी दिलेल्या प्रतिसादामुळे सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात आहे. स्वाध्याय मालिका उपक्रमात प्रश्न रचना ही अध्ययन निष्पत्तीवर आधारित असल्यामुळे मुलांना स्वाध्याय मालिकेतील प्रश्न नवनवीन आव्हान देणारी आहेत. याचमुळे मुलांना स्वाध्याय सोडवणे आवडत आहे. या स्वाध्याय उपक्रमाची लिंक जिल्ह्यातील शिक्षकांच्या ग्रुपवर पाठवली जाते. नंतर ती लिंक पालकांच्या मोबाइलवर पाठवून दिल्यावर मुलं या लिंकमधील प्रश्न आवडीने सोडवतात.

अशी आहे आकडेवारी

४,२१,१८३

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी

३,५६,४८१

स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी

२,६२,६३५

स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी

मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात इयत्तानिहाय पाठ्य घटकावर आधारित पूर्ण होण्यास विद्यार्थ्यांना मदत मिळावी, हा मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वाध्याय उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. विद्यार्थी स्वाध्याय सोडवित असून, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे काम सुरू आहे.

- रवींद्र खंदारे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

शिक्षण प्रवाहाशी जोडणारा उपक्रम

स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम घेतला जात आहे. जिल्ह्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण प्रवाहाशी जोडणारा एक नवीन शैक्षणिक सेतू तयार झाला आहे.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

विद्यार्थी म्हणतात...

शासनाने सुरू केलेल्या स्वाध्याय उपक्रमामुळे अभ्यासात सातत्य राहत आहे. या उपक्रमाचा परीक्षेत मोठा लाभ होणार आहे. यामुळे गुणही चांगले मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

- रणजित पिसाळ, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा

स्वाध्याय उपक्रमामुळे आम्हाला परीक्षेचा सराव होत आहे. वेगवेगळ्या विषयांचे स्वाध्याय येतात. इंग्रजी विषयाचा येत नाही. या सरावामुळे भविष्यातील परीक्षा कोणत्याही दडपणाविना देता येणार आहे.

- िि

ि

(विद्यार्थी फोटो आहे)

Web Title: The district ranks second in the state in the 'Swadhyay' initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.