कीर्तनातून उलगडते ती ज्ञानेश्वरीची ओवी : मनीषा खांडे यांचा प्रबोधनात्मक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:09 PM2018-03-07T23:09:06+5:302018-03-07T23:09:06+5:30

सातारा : आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. प्रवचन करणं हे खरंतर पुरुषाचं काम. परंतु माण तालुक्यातील कोळेवाडी येथील मनीषा प्रकाश खांडे या व्याख्यानाबरोबर प्रवचन देण्याचंही काम करीत आहेत.

 Dnyaneshwari's Ovi unveiled by Kirtana: Manisha Khanday's Enlightenment Program | कीर्तनातून उलगडते ती ज्ञानेश्वरीची ओवी : मनीषा खांडे यांचा प्रबोधनात्मक उपक्रम

कीर्तनातून उलगडते ती ज्ञानेश्वरीची ओवी : मनीषा खांडे यांचा प्रबोधनात्मक उपक्रम

Next
ठळक मुद्देधकटवाडीची सुप्रिया महाडिक पोहोचवतेय घरोघरी ज्ञानेश्वरी

भोलेनाथ केवटे।
सातारा : आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. प्रवचन करणं हे खरंतर पुरुषाचं काम. परंतु माण तालुक्यातील कोळेवाडी येथील मनीषा प्रकाश खांडे या व्याख्यानाबरोबर प्रवचन देण्याचंही काम करीत आहेत. मनीषा खांडे यांचे पती सीमेवर देशसेवा करीत असताना दुसरीकडे मनीषा खांडे यांनी प्रवचनाच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत अंगिकारले आहे.

मनीषा खांडे या मूळच्या माण तालुक्यातील कोळेवाडी गावच्या. खटाव तालुक्यातीलल डोंबाळे त्यांचं सासर. मनीषा खांडे सांगतात, ‘त्यांचे आजोबा, वडील कीर्तनकार होते. वारकरी संप्रदायातील त्यांची ही पाचवी पिढी आहे. परंपरागत चालत आलेला प्रबोधनात्मक उपक्रमाचा हा मार्ग मी अवलंबला आहे, याचा माझ्या कुटुंबाला अभिमान आहे. पती आर्मीत आहेत. ते भोपाळ येथे देशासाठी कर्तव्य बजावत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांवर त्या व्याख्यान देतात. प्रत्येक घरात शिवराय व त्यांचा खरा इतिहास पोहोचविला पाहिजे, हा त्यांचा मानस आहे. व्याख्यानातून ते शिवाजी महाराजांचा इतिहास जागा करतात तर प्रवचनातून व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवितात. प्रवचनाच्या माध्यमातून संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवितात आणि विशेष म्हणजे या यासाठी मानधनाचीही अपेक्षा केली नाही. जे देतील त्या माध्यमातून त्या प्रवचनाचे, व्याख्यानाचे कार्य करतात.
आजचा भरकटलेला तरुण व्यसनमुक्त कसा होईल? व्यसनमुक्तीवर व्याख्यान देत आहेत. अनेकांना व्यसनाचे तोटे समजावून सांगत आहेत.

नववीपासून आवड...
खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोलीजवळील धकटवाडी या गावातील सुप्रिया त्रिंबक महाडिक हीसुद्धा समाजप्रबोधनात्मक प्रवचन करत आहे. ती ज्ञानेश्वरीवर प्रवचन करते. इयत्ता नववीपासून ती प्रवचनाचे काम आवडीने करीत आहे. आता ती छत्रपती शिवाजी महाविद्यालय वडूज येथे पदव्युत्तरच्या वर्गात शिकत आहे. मानधनाची कोणतीही अपेक्षा न करता घरोघरी ज्ञानेश्वरी पोहोचविण्याचे काम ती करीत आहे.

 

मला समाजप्रबोधन करायला आवडते. माझे वडील, आजोबा हेसुद्धा कीर्तनकार असल्याने समाजासाठी काहीतरी करावे, यासाठी मी हा मार्ग स्वीकारला. माझ्या कुटुंबाचा या समाजप्रबोधनात्मक उपक्रमास पूर्ण पाठिंबा आहे. पुढे कीर्तनही करण्यास मला आवडेल.
- मनीषा खांडे, प्रवचनकार

Web Title:  Dnyaneshwari's Ovi unveiled by Kirtana: Manisha Khanday's Enlightenment Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.