बंधने घालू नका, आम्ही झाडे वाढवू

By admin | Published: September 17, 2015 10:52 PM2015-09-17T22:52:02+5:302015-09-18T23:37:32+5:30

स्थानिकांची मागणी : पठारावर जागोजागी वनकार्यालये उभारा--...पण अगोदर माणूसही वाचवा!

Do not bind, we grow plants | बंधने घालू नका, आम्ही झाडे वाढवू

बंधने घालू नका, आम्ही झाडे वाढवू

Next

प्रमोद सुकरे/अरुण पवार ल्ल कऱ्हाड/ पाटण  --‘पर्यावरण व वन्यजीवांचे रक्षण करताना लोकांचे जीवन सुरक्षित राहिले पाहिजे. आमच्या भोवताली कोंडाळे करू नका. अगोदर लोकांना विश्वासात घ्या. त्यांचे रक्षण करा; बंधने घालू नका, मग आम्हीच झाडे वाढवू, असे आवाहन माजी मंत्री व विक्रमसिंह पाटणकर यांनी केले आहे.पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणार कोण आणि नुकसानभरपाई कधी मिळणार, असा प्रश्न लोकांसमोर उभा आहे. लोकांनी नुकसानीची किंवा वन्यप्राण्याने हल्ला केल्याची खबर द्यायला पाटणला जायचे म्हटले तर ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. कोयना येथे वन्यजीव विभागाचे कार्यालय आहे. तेथील अधिकारी म्हणतात की, ‘जर वन्यप्राण्यांने हल्ला किंवा पिकांचे नुकसान केल्यास आम्ही भरपाई देतो.’ मात्र कोयनेच्या कार्यालयातील वनकर्मचारी सतत व्याघ्र प्रकल्पात असतात. कार्यालयमध्ये एकच कर्मचारी असतो. मग यांना शोधायचे कुठे, असा प्रश्न लोकांसमोर पडतो.स्थानिक जनतेच्या हितासाठी प्राधान्य देताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाटण तालुक्यातील डोंगर पठारावर जागोजागी वन कार्यालये उभी करावी, तिथे मोठ्या प्रमाणात वनकर्मचाऱ्यांची उपलब्धतता करावी. म्हणजे स्थानिक जनतेला जर वन्य प्राण्यांकडून त्रास झाला, तर तातडीने याची दखल घेण्यात येईल आणि नुकसानभरपाई देता येईल, असाही एक पर्याय सुचविण्यात येत आहे. म्हणूनच जर कार्यालये, वनकर्मचारी व्याघ्र प्रकल्पात नसतील तर काय लोकांना वन्यप्राण्यांच्या जबड्यात देणार काय, असा सवाल व्यक्त होत आहे.


वन्यजीवच्या कडक कायद्याचा किस्सा --गावकऱ्यांनी स्वत:च्या शेतातील चिंचेची दोन झाडे सरपणासाठी तोडली. या झाडांवर ३२० वटवाघळांची घरे होती. याबाबत पर्यावरणप्रेमींनी तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेतली गेली. गावकऱ्यांना वनविभागाच्या कडक कायद्याला सामोरे जावे लागले. तब्बल ४५० जणांना अटक करण्यात आली.

Web Title: Do not bind, we grow plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.