ऑक्सिजनअभावी रुग्णांची हेळसांड नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:39 AM2021-04-22T04:39:44+5:302021-04-22T04:39:44+5:30

पाटण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सातारा जिल्हयात सरासरी रोज १५०० च्या पुढे कोरोनाबाधित होत आहेत. ...

Do not care for oxygen deficient patients | ऑक्सिजनअभावी रुग्णांची हेळसांड नको

ऑक्सिजनअभावी रुग्णांची हेळसांड नको

Next

पाटण

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सातारा जिल्हयात सरासरी रोज १५०० च्या पुढे कोरोनाबाधित होत आहेत. सगळीकडे रुग्णालयांमध्ये बेडची क्षमता संपली आहे. आपल्याकडे पाटण मतदारसंघात पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रांमध्ये अनुक्रमे ५०, ५० व ३६ याप्रमाणे ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांना ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करून दयावेत. ऑक्सिजनअभावी रुग्णांची हेळसांड होऊ देऊ नका, अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना केल्या.

दौलतनगर (ता. पाटण) येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली वाढत्या कोरोना रुग्णांसंदर्भात तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक झाली. याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश टोमपे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, उंब्रजचे सपोनि अजय गोरड, मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील, कोयनानगरचे सपोनि माळी, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदींची उपस्थिती होती.

देसाई यांनी, पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येसंदर्भात व पाटण, ढेबेवाडी व दौलतनगर येथील कोरोना उपचार केंद्रातील उपलब्ध ऑक्सिजन बेडच्यासंदर्भात आढावा घेतला. आवश्यक असणारे ऑक्सिजन बेड आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या रुग्णांना व्हेन्टिलेटरची आवश्यकता आहे, त्या रुग्णांना तात्काळ कऱ्हाड अथवा सातारा येथे कुठे व्हेन्टिलेटरचे बेड उपलब्ध होतात का याकरिता आपण प्रयत्नशील राहू. परंतु प्राथमिक स्तरावर ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देऊन रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करावेत. पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रांमध्ये सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. कोरोनाच्या तपासण्या वाढवा. कोरोना बाधितांच्या संपर्कात कोण आले आहे का? याचीही तपासणी करा, असे सांगून आपण रेडझोनमध्ये जाणार नाही, याची काळजी घ्या.

चौकट

संचारबंदी एकदम कडक करा

भाजीपाला व किराणा माल घेण्याकरिता मार्केटमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. शासनाने जी संचारबंदी लागू केली आहे, त्याची काटेकोर अंमलबजावणी करा. संचारबंदी कडक केल्याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार नाही. उद्यापासून पोलीस विभागाने संचारबंदी एकदम कडक करून लोकांच्या गर्दीवर निर्बंध आणावेत, वेळप्रसंगी कठोर पावले उचला, असेही शंभूराज देसाईंनी बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

चौकट

तपासण्या व लसीकरणही करून घ्या

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असून, पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने कोरोनाच्या तपासण्या करून घ्याव्यात. तसेच शासनाने जी लस उपलब्ध करून दिली आहे, त्या लसीकरणाचाही लाभ घेऊन आपले जीव वाचवा, असे भावनिक आवाहनही देसाई यांनी केले

Web Title: Do not care for oxygen deficient patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.