सरत्या वर्षाला निरोप देताना ‘दारू नको दूध प्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:53 PM2017-12-31T23:53:30+5:302017-12-31T23:58:23+5:30

'Do not drink milk and drink milk' while releasing yearly | सरत्या वर्षाला निरोप देताना ‘दारू नको दूध प्या’

सरत्या वर्षाला निरोप देताना ‘दारू नको दूध प्या’

Next


सातारा : सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वच उत्साहात असतात. अनेकजण दारूच्या नशेत बेधुंद होऊन डीजेच्या तालावर नाचून थर्टीफस्ट साजरे करतात. अंनिसच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रविवारी राजवाडा परिसरात ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या मोहिमेद्वारे दुधाचे वाटप करून ‘दारू नको दूध प्या,’ असा संदेश दिला.
सरत्या वर्षाचे आभार मानून कडू-गोड आठवणींचा संचय घेऊन आगामी वर्षात पदार्पण करताना अनेकजण दारूचा पहिला अनुभव घेतात. दारूच्या नशेत बेधुंद होऊन व्यसनाधीनतेकडे वाटचाल करतात. त्यामुळे अनेकांचे जीवन उद्धवस्त होते. तरुणाईला या व्यसनाधीनतेतून बाहेर काढण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी गेली अनेक वर्षे ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था यांच्या वतीने ‘दारू नको दूध प्या’ हा उपक्रम सातारा शहरात राबवला जातो. यावेळी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील विवेकवाहिनीच्या कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्य सादर केले. उपक्रमादरम्यान, ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा,’ ‘नो चिअर नो बिअर, ओन्ली हॅप्पी न्यू ईयर,’ ‘हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर, खाणार नाही गुटखा पिणार नाही बिअर,’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नवीन संकल्प व नवी ऊर्जा घेऊन आप्तेष्टांबरोबर खाण्याबरोबर, संगीत व खेळांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊन नवीन वर्षांचे स्वागत करा, असा संदेश देण्यात आला. यावेळी डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, कुमार मंडपे, उदय चव्हाण, वंदना माने, भगवान राणदिवे, अजय ढाणे, डॉ. दीपक माने, प्रशांत पोतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: 'Do not drink milk and drink milk' while releasing yearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.