नका वाटू दारू.. अन्यथा आम्ही ‘नोटा’ वापरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:44 PM2019-04-08T22:44:06+5:302019-04-08T22:44:12+5:30

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : निवडणूक म्हटले की जेवण, दारू आणि पैसे असे जणू समीकरणच झाले ...

Do not feel like alcohol. Otherwise we use 'notes' | नका वाटू दारू.. अन्यथा आम्ही ‘नोटा’ वापरू

नका वाटू दारू.. अन्यथा आम्ही ‘नोटा’ वापरू

Next

स्वप्नील शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : निवडणूक म्हटले की जेवण, दारू आणि पैसे असे जणू समीकरणच झाले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असताना मतदारांना विविध प्रलोभने दाखवून आकर्षित केले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रणरागिणींनी यंदाची निवडणूक दारूमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. जावळी तालुक्यातील गांजे येथे झालेल्या महिलांच्या बैठकीत दारू वाटणाऱ्या उमेदवारावर नोटा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत जिल्ह्यातील सुमारे १०० महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
महिला राजसत्ता अभियानाच्या वतीने मतदान जागृती अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी महिला राजसत्ता अभियानच्या जिल्हा समन्वयक संगीता वेंदे, अ‍ॅवॉर्डच्या नीलिमा कदम, गांजेच्या सरपंच लक्ष्मी चिकणे, सावलीच्या सरपंच आशा देशमुख, बिभवीच्या सरपंच मंगल देशमुख, ग्रामपंचायत सदस्या संगीता परिहार, ऐकीवच्या सरपंच संगीता गोरे, सांगवीच्या सरपंच भाग्यश्री पवार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बैठकीच्या सुरुवातीला मतासाठी पैसे मागू नका, स्वत:चा हक्क विकू नका, आपला मतदानाचा हक्का बजावून गावामध्ये १०० टक्के मतदान होण्यासाठी सरपंच व महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच जो पाजेल मतदाराला दारू, त्या उमेदवारांच्या विरुद्ध नोटा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. दारूमुक्त निवडणूक या अभियानामुळे निवडणुकीत बेकायदा दारूचा वापर बंद होईल. त्याचबरोबर मतदार पूर्ण शुद्धीत आपल्या विवेकाने मतदान करतील. हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय असेल, असे सांगण्यात आले.
दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीदरम्यान बेकायदा दारू विक्री व वाहतुकीवर प्रशासनाची करडी नजर आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी व छापा कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ११ मार्चपासून ७२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी ५९ जणांना अटक करण्यात आली असून, दारूसह २९ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने देण्यात आली. आगामी काळात अशी कारवाई सुरू राहणार आहे.

महिलांनी काही घोषणा ठरविल्या
वोट हमारा राज हमारा, मतदार गुलाम तर गाव गुलाम, मतदार गुलाम तर देश गुलाम, मतांचा लिलाव लोकशाहीवर घाव, लोकशाहीची खरी शान, शंभर टक्के मतदान मतांसाठी पैसे मागू नका, स्वत:चा हक्क विकू नका,माझं मतदान माझा स्वाभिमान. माझं मत माझी इज्जत, मतासाठी पैसे मागणार नाही. या घोषणांद्वारे सातारा जिल्ह्यात मतदारांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे.

Web Title: Do not feel like alcohol. Otherwise we use 'notes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.