डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा आग्रह धरू नका : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:36 AM2021-04-14T04:36:08+5:302021-04-14T04:36:08+5:30
सातारा : कोरोना रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन केव्हा द्यायचे ते डॉक्टरांना ठरवू द्या नातेवाईकांनी विनाकारण त्याचा आग्रह धरू नये, असे ...
सातारा : कोरोना रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन केव्हा द्यायचे ते डॉक्टरांना ठरवू द्या नातेवाईकांनी विनाकारण त्याचा आग्रह धरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, रेमडेसिविर इंजेक्शन कुणाला द्यावे, यासंदर्भात आरोग्य यंत्रणा निर्णय घेते. काही ठिकाणी अनेकदा रुग्णाचे नातेवाईक हेच रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन द्यायला हवे, असा आग्रह डॉक्टरांच्या करत आहेत त्यामुळे अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होते इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ज्या रुग्णाला अत्यावश्यक परिस्थितीमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे अशा रुग्णांना ते देण्यात येणार आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा योग्य प्रमाणात करण्याचे सूचना को बीड रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलला देण्यात आले आहेत. काही प्रमाणात या इंजेक्शनचा साठा उपलब्ध करू शकलो, काही प्रमाणात थोडा अजून ही संपूर्ण परिस्थिती थोडी आहे. रेमडेसिविर उत्पन्न करणाऱ्या कंपन्या तसेच जिल्हा आणि राज्यस्तरावरील स्टॉकिस्ट तसेच अण्णा औषध विभाग यांच्याशी संपर्क साधून आम्ही ते इंजेक्शन योग्य प्रमाणात मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत. रेमडेसिविर बनवणाऱ्या कंपन्या आणि स्टॉकिस्ट यांच्या चेनद्वारेच हॉस्पिटलला इंजेक्शनचा साठा मिळतो कुठल्याही खासगी ग्राहकाला थेट तो देण्यात येणार नाही. कोविड हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
दरम्यान, आपल्या हॉस्पिटल त्यांना सर्वांना माझी परत परत विनंती राहील की तुम्ही वेगवेगळी कंपनीला तुमचेतर्फे ऑर्डर देऊन ठेवा जेणेकरून सप्लायमध्ये प्रॉब्लेम होणार नाही.