ऑक्सिजन टँकर वाहनांची अडवणूक करू नका : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:41 AM2021-04-20T04:41:31+5:302021-04-20T04:41:31+5:30
सातारा : ऑक्सिजन टँकर, सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नाहक अडवणूक करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी दिली. सातारा ...
सातारा : ऑक्सिजन टँकर, सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नाहक अडवणूक करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील शासकीय वा खासगी रुग्णालयांना पुणे, कोल्हापूर येथील ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधून ऑक्सिजन टँकर, हॉस्पिटलमधील छोटे-मोठे ऑक्सिजन सिलिंडरमधून पुरवठा करण्यात येत आहे. पुण्याहून येताना राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील खेड शिवापूर व आनेवाडी पथकर नाका व कोल्हापूरहून येताना किणी व तासवडे पथकर नाका येथे पथकरासाठी वाहने अडवून याचे वजन करणे व इतर कागदपत्रे तपासणी यासाठी नाहक अडवणूक करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. वास्तविक प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना कोविड-१९चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत २४ बाय सात या कालावधीत पथकरातून सूट दिलेली असल्यामुळे पथकर नाक्यावर अन्य कोणत्याही कारणास्तव या वाहनांची अडवणूक करण्यात येऊ नये. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरून ऑक्सिजन टँकर, हॉस्पिटलमधील छोटे-मोठे ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन राखीव ठेवावी अथवा सुरू असलेल्या लेनमधून ही वाहने तात्काळ सोडण्याची कार्यवाही करावी. ऑक्सिजन टँकर, जी वाहने ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणार आहेत त्यांना तात्काळ सोडणे आवश्यक असल्याने त्या वाहनांची अन्य कोणत्याही करणास्तव अडवणूक करण्यात येऊ नये.