चारा, पाणी मिळत नसल्याची तक्रार नको; एकनाथ शिंदेंच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:11 PM2018-10-29T23:11:51+5:302018-10-29T23:12:25+5:30

सातारा : ‘जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती भयंकर आहे. त्यामुळे जनावरांना चारा आणि माणसांना पाणी देण्यासाठी ...

Do not report fodder, do not get water; Eknath Shinde's suggestions | चारा, पाणी मिळत नसल्याची तक्रार नको; एकनाथ शिंदेंच्या सूचना

चारा, पाणी मिळत नसल्याची तक्रार नको; एकनाथ शिंदेंच्या सूचना

googlenewsNext

सातारा : ‘जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती भयंकर आहे. त्यामुळे जनावरांना चारा आणि माणसांना पाणी देण्यासाठी प्रशासनाने तयार राहावे. चारा, पाणी मिळत नाही, अशी एकही तक्रार येता कामा नये,’ अशी सक्त सूचना बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच यावेळी त्यांनी खटाव तालुका दुष्काळात कसा येईल, हे अधिकाºयांनी पाहावे, असेही स्पष्टपणे सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत मंत्री शिंदे बोलत होते. माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर ही बैठक झाली. यावेळी आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, नरेंद्र पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, उपशहरप्रमुख शिवाजीराव इंगवले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री शिंदे म्हणाले, ‘जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्याचा दुष्काळी दौरा केला. या तालुक्यांत जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न मोठा आहे. खटावमध्ये तर ठराविक काही गावे सोडली तर सर्वत्र पिके करपून गेल्याचे दिसून आले. दुष्काळी भागातील काही गावांत तर आठ-दहा दिवसांत जनावरांसाठी चारा द्यावा लागेल, अशी स्थिती आहे. अशा स्थितीत सर्व गोष्टी तुमच्या हातात नाहीत; पण लोकांच्या मागणीची नोंद घेणे हे तुमच्याकडे आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी सतर्क राहून दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यावा.’
दरम्यान, या आढावा बैठकीत प्रामुख्याने कृषी, पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. जिल्ह्यातील विविध पाणी योजनांचीही माहिती मंत्री शिंदे यांनी घेतली. तसेच शेतकºयांच्या फळबागा जळू लागल्या आहेत. त्यासाठी काही करता येईल का, याविषयीही चर्चा झाली.
टँकर वाढवावे लागतील...
जिल्ह्णात चारा, पाणी आणि लोकांच्या हाताला काम हे महत्त्वाचे आहे. येत्या काही दिवसांत माण आणि खटाव तालुक्यात पाण्यासाठी टँकर वाढवावे लागतील, त्यासाठी प्रशासनाने आतापासून तयारी करावी. लोकांना दिलासा देण्यासाठी काम करावे, अशी सूचनाही मंत्री शिंदे यांनी केली.
खटावचे पाचवेळा नाव...
मंत्री शिंदे हे सायंकाळी पावणेसातच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी त्यांनी प्रथम जिल्हाधिकाºयांच्या केबिनमध्ये अधिकाºयांकडून माहिती घेतली. त्यावेळी मंत्री शिंदे यांनी खटाव तालुका प्रथम दुष्काळात कसा बसेल हे पाहा, असे सांगितले. त्यानंतर दुसºया हॉलमध्ये अधिकाºयांबरोबर बैठक झाली. त्यावेळी प्रशासनाने काय काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती घेतली. त्यावेळीही तीन ते चार वेळा खटाव तालुका दुष्काळात कसा बसेल ते पाहा, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच याबाबत मी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे. मुख्यामंत्र्यांशीही बोलणार आहे, असे सांगून दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी अधिकाºयांना राहण्याचे सूचित केले.
जिल्ह्णात आठ महिन्यांचा चारा उपलब्ध...
आढाव्यादरम्यान, अधिकाºयांनी जिल्ह्णात सुमारे आठ लाख पशुधन असल्याचे सांगितले. त्यांच्यासाठी आठ महिने पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. तसेच कालवे असणाºया परिसरात चारा लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळी जनावरांसाठी चारा कमी पडणार नसल्याने अधिकाºयांनी सांगितले. तसेच यावेळी शिंगणापूर पाणी योजना आणि जिहे कटापूर, उरमोडी पाणी योजनेविषयीही माहिती देण्यात आली.

Web Title: Do not report fodder, do not get water; Eknath Shinde's suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.