‘त्या’ डॉक्टरांनी मागितली तृतीयपंथीयाची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:09+5:302021-07-08T04:26:09+5:30

सातारा : जिल्हा रूग्णालयातील एका अधिकाऱ्याने तृतीयपंथीयाला अपशब्द वापरल्यानंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित डॉक्टरने या ...

The doctor apologized to the third party | ‘त्या’ डॉक्टरांनी मागितली तृतीयपंथीयाची माफी

‘त्या’ डॉक्टरांनी मागितली तृतीयपंथीयाची माफी

Next

सातारा : जिल्हा रूग्णालयातील एका अधिकाऱ्याने तृतीयपंथीयाला अपशब्द वापरल्यानंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित डॉक्टरने या तृतीयपंथीयाचे पाय धरून माफी मागितल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.

याविषयी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील एक तृतीयपंथी गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहे. तिची सुश्रुषा करण्यासाठी तिच्या आर्या पुजारी, हिना पवार आदी सकाळीच रूग्णालयात दाखल झाल्या. यावेळी उपचार घेत असलेल्या रूग्णाचे सीटीस्कॅन करावे लागेल, असे सांगितल्यानंतर या सगळ्याच अधिकाऱ्यांकडे गेल्या. तिथे गेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. पोळ यांनी त्यांना पाहून, ‘ए चल सहा फूट लांब थांब’ असं म्हणत अपशब्द वापरले. त्यावर ‘आम्ही इकडे हौसेने नव्हे गरज म्हणून आलोय’, असं सुनावून आर्या पुजारी हिने सही करायला कागद द्यायला तरी जवळ यावं लागेल’, असं ऐकवलं. त्यावर चिडलेल्या डॉ. पोळ यांनी अपशब्द वापरत या तिघींनाही केबीनच्या बाहेर जाण्यास सांगितले. पण अपशब्द वापरल्याने चिडलेल्या या तिघींनीही थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या दालनाकडे मोर्चा वळवला.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात या तिघींनीही तीव्र शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा रूग्णालयात सर्वप्रकारच्या रूग्णांना सेवा पुरवणं हे काम असताना अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी भूमिका घेतली. तप्त वातावरण शांत करण्याचे डॉ. चव्हाण यांचे प्रयत्न सुरू असतानाच डॉ. पोळ यांना बोलावण्यात आले. त्यांना बघून चिडलेल्या तृतीयपंथीयांनी तोंडी बोलून आणि पाया पडून अधिकाऱ्यांनी माफी मागावी, अशी भूमिका घेतली. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करून अक्षरश: पाया पडून माफी मागितल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.

चौकट :

ताई म्हणून हाक मारा!

पुरूषांच्या शरिरात स्त्रिचा आत्मा हे तृतीयपंथी म्हणून आम्ही मान्य केलं आहे. पुरूषांचा देह, त्यांच्यासारखा आवाज असला तरीही आम्ही महिलांसारखे कपडे घालतो, ते हे सांगायला की आम्ही महिला आहोत. समाजाने आम्हाला स्त्री म्हणून मान्यता देणं किंवा आमचा स्वीकार करणं आम्हाला अपेक्षित नाही. हाक मारताना, आमच्याशी बोलताना संयमाने आणि आपलेपणाने बोलावं, ही आमची अपेक्षा आहे. तु ‘तो’ का ‘ती’ याचा विचार करण्यापेक्षा ताई म्हणून हाक मारा, आम्ही तुमच्यासाठी वाट्टेल ते करू, असं हिना पवार हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कोट

निसर्गाने आम्हाला जसं घडवलं तसं राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो. प्रस्थापित व्यवस्थेला आमचं अस्तित्व मान्य नाही, पण कायद्याने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. शरिराने पुरूष असलो तरी मनाने आम्ही महिला आहोत. आमच्या या अस्तित्वाचा आम्हाला अभिमान आहे. इथून पुढे तृतीयपंथीयांशी अदबीने बोलायचं हे सांगण्यासाठी आम्ही आक्रमक झालो.

- आर्या पुजारी, संग्राम संस्था, सातारा

Web Title: The doctor apologized to the third party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.