वरून डॉक्टर... आतून मात्र कार्यकर्ता !

By admin | Published: October 3, 2016 11:45 PM2016-10-03T23:45:44+5:302016-10-04T01:02:57+5:30

समाज बांधवांसाठी आरोग्यसेवा : स्वयंसेवकांनी घडविले माणुसकीचे दर्शन

Doctor from the inside ... only worker! | वरून डॉक्टर... आतून मात्र कार्यकर्ता !

वरून डॉक्टर... आतून मात्र कार्यकर्ता !

Next

सातारा : महामोर्चात सर्वच क्षेत्रातील समाजबांधव उतरल्याचे सोमवारी दिवसभर पाहायला मिळत होते. प्राध्यापक, वकील अन् अभियंत्यांसोबत डॉक्टरही यात होते. एक डॉक्टर तर चक्क आतमध्ये स्वयंसेवकाचा काळा टी-शर्ट घालून वर पुन्हा वैद्यकीय पेशाचा पांढरा कोट वापरत असल्याचे पाहून एकजण अनाहूतपणे बोलून गेला, ‘यालाच म्हणतात वरून डॉक्टर... आतून मात्र अस्सल कार्यकर्ता.’



आरोग्य पथकांची कार्यतत्परता
महामोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात जागोजागी आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालय, आर्यांग्ल रुग्णालय यासह विविध रुग्णालयांतील आरोग्य पथके रुग्णवाहिकेसह महामोर्चा मार्गावर ठिकठिकाणी नियुक्त करण्यात आली होती. ज्यांना अत्यवस्थ वाटत होते अशांना पथकांमार्फत वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली.



महावितरणची ‘अखंडित’ सेवा
मराठा क्रांती महामोर्चात वीजपुरवठा खंडित होऊ नये व कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी महावितरण विभागाच्या वतीने महामोर्चादिनी खबरदारी घेण्यात आली. सातारा शहराला वीजपुरवठा करणाऱ्या प्रत्येक डीपीवर एका कर्मचाऱ्याला नियुक्त करण्यात आले होते. जर वीजपुरवठा खंडित झाला अथवा काही बिघाड आल्यास तातडीने दुरुस्ती करण्याचे काम महावितरणच्या चार जंक्शनमधील सुमारे १२५ कर्मचाऱ्यांकडून केले जात होते. या कामासाठी सर्व कर्मचाऱ्यांना महामोर्चाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दि. २ आॅक्टोबर रोजी अत्यावश्यक सूचना करण्यात आल्या होत्या.
चेहऱ्यावरही
लिहिले मी मराठा !
सातारा शहरात मराठा महामोर्चाची सगळीकडे क्रेझ होती. अनेक युवकांनी हेअर स्टाईलही बदलली होती. काहीनी ‘मी मराठा’ असं डोक्यावर कोरलं होतं तर काहीनी चक्क चेहऱ्यावर नाव लिहिलं होते. असे युवक महामोर्चामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. तर अनेकांच्या हातात भगवे झेंडे होते.

Web Title: Doctor from the inside ... only worker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.