कोरोना काळात घटले डॉक्टरांचे वजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:38 AM2021-05-26T04:38:54+5:302021-05-26T04:38:54+5:30

सातारा : गत दीड वर्षापासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची प्रचंड धावपळ होत आहे. ...

Doctor's weight decreased during Corona period! | कोरोना काळात घटले डॉक्टरांचे वजन !

कोरोना काळात घटले डॉक्टरांचे वजन !

Next

सातारा : गत दीड वर्षापासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची प्रचंड धावपळ होत आहे. या ताणतणावातून आपसूकच अनेक डॉक्टरांचे वजन कमी झाले आहे. एरव्ही वजन कमी करण्यासाठी अनेक डॉक्टर मॉर्निंग वॉक करीत होते. मात्र, या कोऱनाच्या काळात केवळ ताण - तणाव आणि धावपळीमुळे डॉक्टरांचे वजन कमी झाले असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाचे प्रचंड प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर सध्या आरोग्य सेवा सुरू आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये ८२ डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. हे डॉक्टर कोरोना रुग्णावर उपचाराबरोबरच इतर आजाराच्या रुग्णांवरही उपचार करीत आहेत. आठ तासांच्या ड्युटीऐवजी १२ ते १३ तास ड्युटी डॉक्टरांना करावी लागत आहे. प्रचंड ताण तणाव डॉक्टरांवर दिसून येत आहे. सातत्याने धावपळ करावी लागत असल्यामुळे साहजिकच अनेक डॉक्टरांचे वजनही घटले आहे.

वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांना फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. एवढा ताण-तणाव त्यांच्या समोर आ वासून उभा आहे. जेवण अवेळी होत असल्यामुळे पोटाचे विकारही अनेकांना झाले आहेत. मात्र, तरीसुद्धा रुग्ण सेवेमध्ये खंड न पडता डॉक्टर आपली सेवा बजावत आहेत.

चौकट: आहाराची घेतात काळजी

ताणतणाव आणि धावपळ यापुढेही रोजचीच असणार आहे, हे जाणून असलेल्या डॉक्टरांनी स्वतःच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले आहे. सकाळी पौष्टिक आहारामध्ये अंडी, दूध, ज्यूस अशा प्रकारचा नाष्टा डॉक्टर घेत आहेत. दुपारच्या जेवणामध्ये सॅलीड, फळे, भाजी, दोन चपात्या, आमटी, भात, वरण, कोशिंबीर अशा प्रकारचा आहार घेत आहेत. हा आहार सकस असल्यामुळे इतर आजार होत नाहीत. शिवाय एनर्जीही दिवसभर टिकून राहते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. संध्याकाळी रुग्णालयातून घरी गेल्यानंतर अत्यंत कमी जेवण हलका आहार घेतात. काही डॉक्टर तर फळाचा ज्यूस घेऊनच झोपी जातात. रात्री झोपण्यापूर्वी हलका आहार घेणे यावर अनेक डॉक्टरांचा भर आहे.

चौकट : धावपळीमुळे वजन कमी झाले; स्वतःहून नाही वजन कमी केले !

ऐन कोरोनाच्या धामधुमीतच माझी सातारा जिल्ह्यात बदली झाली. गत चार महिन्यांपासून सातत्याने एकही दिवस सुटी न घेता रुग्णालयात काम करत आहे. वारंवार बैठका, रुग्णांचा वॉर्डातील राऊंड त्याचबरोबर कोरोना आटोक्यात येण्यासाठी घेत असलेल्या उपाययोजना यावर सातत्याने लक्ष ठेवावे लागत आहे. दिवसभर धावपळ होत असल्यामुळे पहिल्यापेक्षा दोन किलो वजन कमी झाले आहे.

- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

......

कोरोनाच्या महामारीमध्ये एकदाही सुटी घेतली नाही. कोरोनाचे रिपोर्ट, त्याच्या तपासण्या याचा अहवाल पूर्वी मी पाहत होतो. सध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून मी इथे काम पाहतोय. रुग्णालयाची बिले व इतर कामे करीत असताना दिवसभर प्रचंड ताण आणि धावपळ होते. वेळेवर जेवण मिळत नाही. त्यामुळे साहजिकच शरीरावरही परिणाम दिसून आलाय. साधारण दीड किलो वजन महिन्याभरात कमी झाले आहे.

डॉ. ज्ञानेश्वर हिरास

......

सध्या एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी लसीकरणावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना लस देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. लसीच्या नोंदी ठेवणे, रोजच्या रोज लस दिल्यानंतर रुग्णांचे त्यात होणारे बदल, याचे अपडेट ठेवावे लागतात. अनेकांचे दिवसभर फोन आणि बैठका अटेंड कराव्या लागतात. या धावपळीमुळे वजनही दोन किलो घटले आहे.

डॉ. चंद्रशेखर कारंजकर

...........................................................

डॉक्टर - ८२

आरोग्य कर्मचारी - ४२५

Web Title: Doctor's weight decreased during Corona period!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.