रेशनधान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:21+5:302021-07-10T04:27:21+5:30
सातारा : रेशन दुकानदार धान्य देत नाही किंवा अन्य कारणाने जिल्ह्यातील ४३ लोकांनी दुकानच बदलून टाकले तर जून महिन्यामध्ये ...
सातारा : रेशन दुकानदार धान्य देत नाही किंवा अन्य कारणाने जिल्ह्यातील ४३ लोकांनी दुकानच बदलून टाकले तर जून महिन्यामध्ये ७ हजार ५६८ कुटुंबांनी पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ घेतला आहे.
रेशनिंग दुकानदारांबाबत लोकांच्या अनेक तक्रारी असतात. संबंधित दुकानदार ग्राहकांसोबत नीट व्यवहार करत नाही. अरेरावीची उत्तरे देतो, लोकांना हेलपाटे मारायला लावतो, अशा अनेक तक्रारी असतात. अनेकदा ग्राहक दुकानदारासोबत वाद घालतात. मात्र तरीही दुकानदाच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, तर दुकानच बदलण्याचा विचार ग्राहक करतात. त्यातूनच दुकान बदलण्याचा निर्णय घेण्यात येतो.
सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दुकानांची मर्यादा असल्याने ग्रामीण भागात कमी पण शहरी भागात दुकान बदलण्यासाठी पर्याय असतो, त्यामुळे नागरिक दुकानदाराशी वाद होत असेल तर दुकान बदलून शासनाच्या पोर्टेबिलिटी सेवेचा लाभ घेतात.
या व्यतिरिक्त कामानिमित्त गावे बदलावी लागणाऱ्या ग्राहकांनादेखील शासनातर्फे पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून रेशनिंगचे धान्य दिले जाते. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनिंग ग्राहकांना धान्याचा लाभ दिला आहे. एप्रिल महिन्यात ७ हजार ३३, मे महिन्यात ७ हजार ५५७, जून महिन्यात ७ हजार ५६८ लोकांनी पोर्टेबिलिटी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये रेशनिंग दुकानदाराशी वाद होत असल्याने दुकान बदलून धान्य घेणाऱ्यांचा समावेश आहे.
.............................असा मथळा आपल्याला करता येईल. सबहेडमध्ये किती जणांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला याचा उल्लेख करावा...................
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक -
बीपीएल -३,८२,१६४
अंत्योदय -२८२२०
एकूण - ४,१०, ३८४
किती जणांनी दुकानदार बदलला -
२) कोणत्या तालुक्यात किती जणांनी बदलला दुकानदार (ग्राफ)
सातारा : ४
वाई : ३
कऱ्हाड : ७
माण : ३
खटाव : ४
कोरेगाव : ७
पाटण : ३
फलटण : ६
महाबळेश्वर : १
जावली : २
खंडाळा : ३
३) शहरात जास्त बदल
शहर परिसरात दुकानदार बदलण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेकदा स्वस्त धान्य दुकानदारासोबत पटत नसल्याने ग्राहक कंटाळून दुकानदारच बदलतात. लांब अंतर चालून जावे लागले तरी चालेल; परंतु दुकानदाराशी वाद होण्यापेक्षा ते परवडले, अशी लोकांची मानसिकता आहे.
४) नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य
जिल्ह्यातील २८ हजार २८० कुटुंबांनी शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे मोफत धान्य दिले जाणार आहे. शासनाने कोरोनाच्या काळात मोफत धान्य देऊन दिलासा दिला आहे.
फोटो : ०९पुरवठा