श्वानांची स्पर्धा ही दर्शकांसाठी पर्वणी : रामकृष्ण वेताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:48 AM2021-09-16T04:48:12+5:302021-09-16T04:48:12+5:30

ओगलेवाडी : ‘कोरोनाच्या जागतिक संकटामुळे विविध स्पर्धेसह सर्व कार्यक्रम सध्या बंद आहेत. मेरवेवाडी (ता. कऱ्हाड) या ठिकाणी कोरोना नियमांचे ...

Dog competition is a boon for spectators: Ramakrishna Vetal | श्वानांची स्पर्धा ही दर्शकांसाठी पर्वणी : रामकृष्ण वेताळ

श्वानांची स्पर्धा ही दर्शकांसाठी पर्वणी : रामकृष्ण वेताळ

Next

ओगलेवाडी : ‘कोरोनाच्या जागतिक संकटामुळे विविध स्पर्धेसह सर्व कार्यक्रम सध्या बंद आहेत. मेरवेवाडी (ता. कऱ्हाड) या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून होत असलेली ही स्पर्धा सध्या लोकांसह श्वान मालकांसाठी पर्वणी ठरत आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ यांनी केले.

मेरवेवाडी येथील श्वान स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच सुहास यादव, उपसरपंच सतीश खोत, अशोक साळुंखे, सचिन निकम आणि रणजित यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. सातारा, सांगली, सोलापूरसह विदर्भ आणि बाहेरील राज्यातून दीडशेपेक्षा जास्त श्वान या स्पर्धेत सहभागी झाले होते.

वेताळ म्हणाले, ‘बैलगाडीसह सर्व स्पर्धेवरील बंदी शासनाने तत्काळ मागे घ्यावी आणि खुल्या वातावरणात सर्व स्पर्धा पार पाडाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जोश, उल्हास, चपळता आणि वेग याचा थरारक अनुभव यावेळी लोकांना अनुभवता आला.’

यावेळी अशोक साळुंखे, विनय मोहिते, अमर पाटील यासह महाराज ग्रुपचे सर्व सदस्य आणि श्वानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(चौकट)

श्वानप्रेमींमध्ये आनंदोत्सव...

डोळ्यांचे पारणे फेडणारे विविध जातीचे श्वान

अनेक जातीचे, विविध आकाराचे, केसाळ लांब कानाचे, मजबूत शरीरयष्टीचे असे अनेक श्वान येथे पाहायला मिळत होते. मालकांचे प्रेम आणि श्वानांची चपळता हे पाहणे ही पर्वणी होती. ग्रामीण भागात हे पाहायला मिळाल्याने लोकांचा आनंद ओसंडून वाहत होता.

Web Title: Dog competition is a boon for spectators: Ramakrishna Vetal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.