श्वानांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:08+5:302021-02-10T04:39:08+5:30

मलकापूर : येथील आगाशिवनगर, कोयना वसाहत परिसरात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळी ५ ते ८ श्वानांचे टोळके ...

Dog nuisance | श्वानांचा उपद्रव

श्वानांचा उपद्रव

Next

मलकापूर : येथील आगाशिवनगर, कोयना वसाहत परिसरात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळी ५ ते ८ श्वानांचे टोळके एकत्रितपणे दुचाकीचालकांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. तसेच पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनाही श्वानांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे. मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

फलकाची दुरवस्था

शामगाव : शामगाव घाटात अनेक वळणांवर सूचना फलक नाहीत. काही ठिकाणी फलक आहेत. मात्र, चोरट्यांनी पत्रा काढून नेल्यामुळे फलकांचे केवळ सांगाडे उरले आहेत. धोक्याची पूर्वसूचना देणारे फलकच अस्तित्वात नसल्यामुळे चालकांना वाहने चालविताना अडचणी निर्माण होत आहेत. या मार्गावर फलक लावण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

खडीमुळे अपघात (फोटो : ०९इन्फोबॉक्स०२)

कऱ्हाड : शहरातील मुख्य चौकासह अंतर्गत भागात अनेक ठिकाणी नवीन इमारतींची बांधकामे केली जात आहे. इमारत बांधकामासाठी आणण्यात आलेली खडी व वाळू रस्त्यावरच टाकली जात असल्याने दुचाकी घसरत आहेत. बांधकाम करणाऱ्यांना पालिका तसेच पोलिसांकडून समज देणे गरजेचे आहे. तसेच रस्त्यात पडलेले बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी केली जात आहे.

विद्यानगरमध्ये कचरा

कऱ्हाड : विद्यानगर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत़ ओला व सुका कचरा विखुरल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. कृष्णा कॅनॉल तसेच पुलानजीक मोठ्या प्रमाणावर कचरा साचत आहे. ग्रामपंचायतीने ठिकठिकाणचा हा कचरा हटविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Dog nuisance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.