मुक्या वासरांना ‘मद्या’ची अन् तरुणाईला ‘डॉल्बी’ची झिंग..!

By Admin | Published: July 19, 2016 11:01 PM2016-07-19T23:01:00+5:302016-07-19T23:52:33+5:30

वाईतील प्रकार : बेंदरादिवशी श्रमदेवतेची विकृत मनोरंजनासाठी पिळवणूक

Dolby's jingling 'Madya' and 'Young' to the dead calves! | मुक्या वासरांना ‘मद्या’ची अन् तरुणाईला ‘डॉल्बी’ची झिंग..!

मुक्या वासरांना ‘मद्या’ची अन् तरुणाईला ‘डॉल्बी’ची झिंग..!

googlenewsNext

वाई : आपल्या संस्कृतीत बेंदूर सणाला मोठे महत्त्व आहे़ बैल म्हणजे कष्टाचे प्रतीक. अशा श्रमदेवतेची पूजा करण्याचा हा दिवस. मात्र, वाई शहरात या श्रमदेवतेची विकृत मनोरंजासाठी चक्क पिळवणूक करण्यात आली. काही युवकांनी लहान-लहान वासरांना मद्य पाजून त्यांची मिरवणूक काढली. तर दुसरीकडे युवकांनाही ‘डॉल्बी’ची चांगलीच झिंग चढली होती. हे विदारक चित्र पाहून नागरिकांसह अनेक शेतकरी अचंबित झाले.
बैलांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा बेंदूर हा सण आत्मीयतेने साजरा करतो़ परंतु वाई शहरात या प्रतिमेला व पावित्र्याला फाटा दिल्याचे चित्र दिसत आहेत़ बैलांच्या मिरवणुकीत लहान वासरांनाही सहभागी करण्यात आले होते. या वासरांना भर चौकात काही अतीउत्साही तरुणांकडून मद्य पाजण्यात आले. मुक्या प्राण्यांबरोबर केवळ मनोरंजनासाठी करण्यात आलेल्या या विकृत प्रकाराने मात्र नागरिक अचंबित झाले. एवढेच नव्हे तर बैलांचा आदर करण्याऐवजी त्यांची डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजावर तरुणाई मनसोक्त थिरकली असली तरी मुक्या जनावरांची मात्र छळवणूकच करण्यात आली. वाई शहरात बैलांच्या मिरवणुकीत बैल कमी व डॉल्बीच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते जास्त असे चित्र पाहावयास मिळाले. (प्रतिनिधी)

Web Title: Dolby's jingling 'Madya' and 'Young' to the dead calves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.