रक्तदानातून तरुणांनी देशसेवेचे व्रत जोपासले - मकरंद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:10+5:302021-04-14T04:35:10+5:30
खंडाळा : कोरोनाच्या काळात लोकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय विभागाने सतर्क राहून काम केले आहे. चांगल्या पद्धतीने उपचार सुरू आहेत. ...
खंडाळा : कोरोनाच्या काळात लोकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय विभागाने सतर्क राहून काम केले आहे. चांगल्या पद्धतीने उपचार सुरू आहेत. मात्र, या कठीण काळात आरोग्य विभागाला सध्या गरज रक्ताची आहे. लोकांचे आयुष्य वाचविण्यासाठी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, ही भावना जपली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कठीण काळात लोकांच्या आरोग्यासाठी काम करणे गरजेचे असल्याचे मत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.
खंडाळा येथील किसनवीर सभागृहात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाप्रमाणे आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात शंभर तरुणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, सभापती राजेंद्र तांबे, पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या हस्ते झाले.
सभापती राजेंद्र तांबे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन तरुणांनी रक्तदान शिबिर घेऊन आदर्शवत काम केले आहे. सध्याच्या स्थितीत रक्तदान उपयोगी ठरणार आहे.
यावेळी रक्तदान करून देशकार्यात सहभागी झाल्याबद्दल रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी राजेंद्र चव्हाण, गजेंद्र मुसळे, सुप्रिया गुरव, राजेंद्र भोसले, मयूर भोसले, प्रवीण खंडागळे, सागर गुरव, प्रवीण संकपाळ, प्रदीप गाढवे, प्रशांत भोसले, प्रतीक ढमाळ, दादा गायकवाड, प्रतीक मगर, प्रवीण पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो आहे .