Satara: कोडोलीतील जानाई मळाई मंदिरातून दानपेटी चोरीला!
By दत्ता यादव | Published: June 19, 2024 07:18 PM2024-06-19T19:18:19+5:302024-06-19T19:20:42+5:30
सातारा : कोडोली येथील जानाई मळाई मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या दानपेटीमध्ये सुमारे दीड हजारांची चिल्लर होती. ...
सातारा : कोडोली येथील जानाई मळाई मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या दानपेटीमध्ये सुमारे दीड हजारांची चिल्लर होती. हा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला.
कोडोली परिसरातील डोंगरावर जानाई मळाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर लोखंडी दानपेटी ठेवण्यात आली होती. या दान पेटीमध्ये भाविक दर्शन घेतल्यानंतर चिल्लर त्या पेटीमध्ये दान म्हणून टाकत होते. ही दानपेटी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे बुधवारी सकाळी समोर आले. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविण्यात आली.
चोरट्यांनी दानपेटी चोरून नेल्यानंतर गावच्या परिसरातील नागरिकांनी जानाई मळाई डोंगरावर धाव घेतली. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात चोरट्यांनी कुठे दानपेटी टाकली आहे का, याचाही नागरिकांनी शोध घेतला. मात्र कुठेही दानपेटी सापडली नाही. मंदिराच्या पायथ्यालगत काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्या कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले आहेत का, याचाही तपास आता पोलिस करत आहेत.