अनोळखी माणसाला मोबाइल देऊ नका;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:44 AM2021-08-20T04:44:40+5:302021-08-20T04:44:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आतापर्यंत घरे फोडणारे, लूटमार करणारे आपल्याला सापडत होते. पोलिसांचादेखील त्यांच्यावर वचक असतो; मात्र ...

Don't give a mobile to a stranger; | अनोळखी माणसाला मोबाइल देऊ नका;

अनोळखी माणसाला मोबाइल देऊ नका;

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : आतापर्यंत घरे फोडणारे, लूटमार करणारे आपल्याला सापडत होते. पोलिसांचादेखील त्यांच्यावर वचक असतो; मात्र फसवणूक झालेला साताऱ्यात अन् फसवणूक करणारा झारखंडमध्ये अशी परिस्थिती आहे. आपल्या मोबाइलवर मेसेज पाठवणारा आपल्याला गंडा घालून पसार होईल हे लक्षात घ्या. नोकर माणसाला मोबाइल देऊ नका. क्षणात बँक खाते साफ होऊ शकते हे लक्षात घ्या.

अनोळखी माणसाने कॉलसाठी मोबाइल मागितल्यास देऊ नका! या माध्यमातून ओटीपी मिळवून आपल्या खात्यातील पैसे एका क्षणात नाहीसे केले जाऊ शकतात. अशा फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. अनेक जण सध्या मोबाइलवर येणाऱ्या अनोळखी लोकांच्या मेसेजला भुलून लाखो रुपये घालवून बसलेले आहेत.

असा मथळा आपल्याला करता येईल.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक (चार बॉक्स. प्रत्येक बॉक्सचे दोन ओळींमध्ये विश्लेषण द्यावे.)

कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन -

आपण प्रवासात असतो तेव्हा अनेकदा सहप्रवाशांसोबत ओळख होते. मोबाइल नंबरची देवाण-घेवाण होते. अशावेळी मोबाइल फोनमध्ये बॅलन्स नसल्याचे कारण सांगून फोन घेऊन कॉल करतो म्हणूनसुद्धा ओटीपी घेतला जाऊ शकतो.

वेगळी लिंक पाठवून -

आपल्या मोबाइल क्रमांकावर एखादी लिंक पाठवली जाते. ही लिंक ओपन करायची सूचना येते, त्यानुसार लिंक उघडली तरीसुद्धा खात्यातील पैसे जाऊ शकतात.

लॉटरी लागली आहे असे सांगून -

सध्या लाखो, करोडो रुपये आपल्या मोबाइल क्रमांकाला लागल्याच्या बतावण्या करणारे मेसेज फोनवर धडकत आहेत, अशी कुठलीही लॉटरी सहज लागू शकत नाही. तरीसुद्धा लॉटरी लागल्याचा बनाव करून पैसे उकळले जाऊ शकतात.

केवायसीसाठी आवश्यक असे सांगून -

आपल्याला भेटवस्तू मिळणार आहे किंवा अमुक ठिकाणी नोकरी लागणार आहे, असे म्हणूनसुद्धा केवायसी डॉक्युमेंट घेतले जातात, यातूनदेखील आर्थिक फसवणूक होऊ शकते.

२) ही घ्या काळजी

आपला ओटीपी कोणतीही बँक, शासकीय अधिकारी मागत नाहीत. त्यामुळे ओटीपीसाठी काहीही कारण सांगितले तर तो शेअर करू नये, असे केल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

३) सायबर अधिकाऱ्याचा कोट

ऑनलाइन पेमेंटची अनेक माध्यमे आलेले आहेत. त्यावरून सुरक्षितरीत्या पैशांची देवाण-घेवाण करता येऊ शकते; पण अनेक जण मोबाइलवर अनोळखी मोबाइल क्रमांकावरून येणाऱ्या लिंकला बळी पडतात. त्यातून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

- सज्जन हंकारे,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे

Web Title: Don't give a mobile to a stranger;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.