घरटं सोडायचं नाही... काळजी घ्यायची..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:39 AM2021-04-24T04:39:08+5:302021-04-24T04:39:08+5:30
मसूर : कोरोना संसर्ग वाढत असतानाही लोक विनाकारण बाहेर पडत आहेत. रस्त्यावर गर्दी करत आहेत. हे चित्र पाहिल्यानंतर आपण ...
मसूर : कोरोना संसर्ग वाढत असतानाही लोक विनाकारण बाहेर पडत आहेत. रस्त्यावर गर्दी करत आहेत. हे चित्र पाहिल्यानंतर आपण वाहक की देशाचा सहाय्यक बनणार?
असा प्रश्न निर्माण होता. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी ‘घरटं सोडायचं नाही, काळजी घ्या', असा
सामाजिक संदेश चित्राद्वारे दिला आहे.
राज्यात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. कोरोना साखळी तोडण्यासाठी एक प्रकारे हा कडक लाॅकडाऊन असणार आहे. शासन व प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांकडून तशाच प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना ‘कोरोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार? असा प्रश्न विचारत ‘घरटं सोडायचं नाही, काळजी घ्या’. असा संदेश छायाचित्रातून राज्याचे प्राथमिक तथा प्रौढ व अल्पसंख्याक शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे.
कोरोनाबाबत जनजागृतीची अनेक पोस्टर्स त्यांनी सोशल मीडियावर प्रकाशित केली आहेत, त्यापैकी 'कोरोना संसर्गाचा वाहक की, देशाचा सहाय्यक बनणार?' आणि 'घरटं सोडायचं नाय...!' ही त्यांनी पोस्ट केलेली छायाचित्रे खूपच व्हायरल झाली आहेत.
कोरोना विषाणू
तुमच्या घरी येणार नाही,
जोपर्यंत तुम्ही त्याला
आणायला बाहेर जात नाही. डाॅक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे
माणसांतील देवांना सलाम, कोरोनाची
साखळी तोडायचीय... कुटुंबाला आणि देशाला
कोरोनापासून वाचवायचंय...,
लक्षात ठेवा, ही लढाई जिंकायची आहे, हरायची नाहीय...,
बहिरे व्हा
अफवांना थारा देऊ नका
अफवा
कोरोनापेक्षा
भयंकर
असू शकतात,
अशा शब्द व चित्ररुपी संदेशांचा त्यात समावेश आहे.
यापूर्वी क्षीरसागर यांनी सातारा येथे जिल्हास्तरावर काम करत असताना शैक्षणिक उपक्रमाबरोबरच कोरोना जागृतीचे अनेक उपक्रम राबविले, त्याचे राज्यभर कौतुक झाले.
फोटो जगन्नाथ कुंभार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी 'घरटं सोडायचं नाही, काळजी घ्या' असा संदेश चित्रातून दिला आहे.