पाव्हणं गडबड नका करू... एसटी यायला दहा मिनिटं अजून हायती वाईज चहा घेऊन जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:04+5:302021-07-08T04:26:04+5:30

सातारा : बसस्थानकाच्या दारात पोहोचतो आणि एसटी निघून गेल्याचे अनेकांनी अनुभवले असतील. त्यानंतर मात्र अशी वेळ येऊ नये म्हणून ...

Don't make a fuss ... take Haiti Wise Tea ten minutes to ST! | पाव्हणं गडबड नका करू... एसटी यायला दहा मिनिटं अजून हायती वाईज चहा घेऊन जा!

पाव्हणं गडबड नका करू... एसटी यायला दहा मिनिटं अजून हायती वाईज चहा घेऊन जा!

googlenewsNext

सातारा : बसस्थानकाच्या दारात पोहोचतो आणि एसटी निघून गेल्याचे अनेकांनी अनुभवले असतील. त्यानंतर मात्र अशी वेळ येऊ नये म्हणून हातातील काम अर्धे सोडून धावपळ करून बसस्थानकात वेळेवर आपण जात असतो. पण आता याला ब्रेक लागणार आहे. एसटी कुठेपर्यंत आलेली आहे हे आपल्या मोबाईलवर समजणार असल्याने ''पाहुणं जरा थांबा एसटीला वेळ आहे... चहा घेऊनच जावा,'' असे संवाद ऐकायला मिळाल्यास नवल वाटणार नाही.

राज्य परिवहन महामंडळाने स्वतःच्या कार्यपद्धतीत सातत्याने बदल करत आलेला आहे. प्रवाशांना इतर वाहतूक संस्था देत असलेल्या सेवांचा विचार करून एसटीने स्वतःमध्येही अनेक बदल करून घेतले आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे एसटी महामंडळाने दोन वर्षांपूर्वी व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात या तंत्रज्ञानाचा वापर एसटीच्या अधिकाऱ्यांना करता येत होता. अमुक गाडी सध्या कोठे आहे. कोणत्या मार्गावरून धावत आहे. त्यावर चालक आणि वाहक कोण आहेत. हे एका ठिकाणी बसून अधिकाऱ्यांना समजत होते. आता ही सुविधा सर्वसामान्य प्रवाशांनाही मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांनी हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना हवे ते त्या गाडीचे लोकेशन किंवा त्या मार्गावर कोणत्या गाड्या धावत आहेत याची माहिती मिळते. त्याप्रमाणे गाडीला येण्यास आणखीन किती वेळ लागू शकतो हे समजते. प्रवाशाकडे एखाद्या एसटीचा नंबर उपलब्ध असल्यास तो नंबर टाकल्यास ही गाडीवर चालक वाहक कोण आहेत, त्यांचा मोबाईल क्रमांक याचीही माहिती एका क्लिकवर मिळते.

चौकट...

चालकांच्या फसवेगिरीला लगाम

अनेक चालक-वाहक मुक्कामी गाडी त्यांच्या सोयीच्या ठिकाणी घेऊन जात असतात. प्रवाशांना शेवटच्या थांब्यावर सोडून हे मंडळी एसटी घेऊनच नातेवाइकांकडे गेल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रासंगिक कराराच्या वेळी ग्राहकांनी जवळचा मार्ग दिलेला असतो. मात्र प्रत्यक्षात दुसऱ्याच मार्गावरून एसटी नेली जाते. याचा एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसत असतो. या आधुनिक यंत्रणेमुळे चालक वाहकांच्या फसवेगिरीला एक प्रकारे ब्रेक लागणार आहे.

चौकट

एसटीच्या वेगाचीही चूक माहिती

एसटी महामंडळात कोणती गाडी कोणते चालक-वाहक घेऊन जाणार आहे त्याचे नियोजन आदल्या दिवशी केले जाते. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे जेव्हा चालक-वाहक एसटी डेपोतून बाहेर पडतो तेव्हा त्याची नोंद या व्हीटीएस यास यंत्रणेवरच केली जाते. यामध्ये गाडीचा क्रमांक, चालक वाहक यांचे नाव, मोबाईल नंबर याची माहिती दिली जाते.

सहाजिकच एसटीमध्ये बसवलेल्या जीपीआरएस सिस्टीममुळे ही गाडी कोठेपर्यंत आलेली आहे याची माहिती प्रवाशांसह एसटीच्या अधिकाऱ्यांना मिळत असते.

अनेक बसस्थानकात सडक सख्याहरींचा तरुणींना त्रास होत असतो. त्यांनी या सुविधेचा वापर केल्यास एसटी येण्याच्या अपेक्षित वेळेच्या आधी काही मिनिटेच बसस्थानकात जाणे त्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे बसस्थानकात विनाकारण ताटकळत थांबण्याची गरज भासणार नाही.

चौकट

बसस्थानकात लागली मोठी स्क्रीन

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे अशी मंडळी एसटी येण्याच्या काही मिनिटे अगोदर येऊ शकतात. मात्र इतर मार्गावरून प्रवास करत असलेल्यांना मध्येच थांबण्याची वेळ आल्यास त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बसस्थानकात गेल्या काही महिन्यांपासून मोठी स्क्रीन लावल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर एसटीचा क्रमांक, एसटीचा मार्ग, अपेक्षित वेळ याची माहिती दिली जाते.

कोट

लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू

सातारा आगारात ही यंत्रणा दोन वर्षांपासूनच कार्यान्वित आहे. मात्र कोरोनाकाळात एसटीचे नियोजन कोलमडल्याने ती बंद करण्यात आली होती. ही सुविधा आता पुन्हा सुरू केल्याने प्रवाशांना फायदा होत आहे.

- रेश्मा गाडेकर,

आगार व्यवस्थापक सातारा.

Web Title: Don't make a fuss ... take Haiti Wise Tea ten minutes to ST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.